मुंबई

बोन मॅरो प्रत्यारोपण केंद्र बालकांसाठी जीवनदायी

CD

बोन मॅरो प्रत्यारोपण केंद्र बालकांसाठी जीवनदायी
३६० मुलांचे वाचले प्राण; रुग्णांसाठी बोरिवली एकमेव पर्याय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : रक्ताच्या आजारांनी त्रस्त असलेल्या मुलांसाठी बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट हा एकमेव पर्याय आहे. मात्र, हा उपचार खर्चिक असल्याने तो अनेकांना परवडत नाही. त्यामुळे आता पालिकेचे बोरिवलीतील एमसीजीएम-कॉम्प्रिहेन्सिव्ह थॅलेसेमिया केअर, पेडियाट्रिक हेमॅटोलॉजी-ऑन्कोलॉजी असलेले बीएमटी सेंटर या आजारी मुलांसाठी जीवन जगण्याचा नवीन मार्ग निर्माण करत आहेत.
यवतमाळ येथे राहणाऱ्या खुडे दाम्पत्याचा मुलगा तीन महिन्यांचा असल्यापासून तापाने आजारी होता. कुटुंबीयांनी मुलाला उपचारांसाठी केईएम रुग्णालयात दाखल केले होते, तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केईएम रुग्णालयाच्या भेटीप्रसंगी मुलाला बोरिवलीच्या बीएमटी केंद्रात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, मुख्यमंत्र्यांसह अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी केईएम रुग्णालयाच्या डॉक्टरांनाही निर्देश देऊन उपचार करण्यास सांगितले. त्यामुळे मुलाला जीवदान मिळाले.
..........................................
प्रतिक्रिया-
मी मेकॅनिक म्हणून काम करतो. माझ्या मुलाला रक्ताचा आजार होता आणि त्याला बोन मॅरो ट्रान्सप्लांट आवश्यक होते. बीएमटीचीच किंमत १८ लाख रुपये होती; मात्र मुलाचे पालिकेच्या बीएमटी केंद्रात मोफत प्रत्यारोपण करण्यात आले.
- आकाश खुडे, रुग्ण मुलाचे वडील
....................................................
देणगीदाराकडून मदत -
बीएमटी सेंटरचे फिजिशियन डॉ. राजेश पाटील यांनी सांगितले की, शिवराजला हेमोफॅगोसाइटिक लिम्फोहिस्टिओसायटोसिस (एचएलएच) या रक्ताच्या आजाराने ग्रासले होते. त्यामुळे शिवराजला या आजारातून बरे करण्यासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट हा एकमेव उपाय होता.
..........................................
६ वर्षांत इतके प्रत्यारोपण-
पालिकेच्या या समर्पित बालरोग अस्थिमज्जा प्रत्यारोपण केंद्रात गेल्या सहा वर्षांत ३६० अस्थिमज्जा प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. केंद्रात ऑटोलॉगस आणि ॲलोजेनिक बोन मॅरो ट्रान्सप्लांटचे दोन्ही प्रकार केले जातात. केंद्राने आतापर्यंत १२५ ऑटोलॉगस बीएमटी केले आत.
...................................
प्रतिक्रिया-
रुग्णाच्या पालकांच्या आर्थिक स्थितीचे मूल्यमापन करून त्यांच्या उपचारांसाठी पैसे उभारण्यास मदत केली जाते. रुग्णाला सर्वोत्तम उपचार मिळावेत, या उद्देशाने रुग्णालयाची टीम रात्रंदिवस काम करते.
- डॉ. ममता मंगलानी, संचालक (शैक्षणिक आणि संशोधन)
..........................................
बीएमटीचे ८ बेड्स
हे केंद्र पालिकेने २०१७ मध्ये स्थापन केले होते. २०१८ पासून केंद्राने बोन मॅरो प्रत्यारोपण सुरू केले. बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी ८ बेड उपलब्ध असलेले हे मुंबईतील एकमेव केंद्र आहे. याशिवाय सायन रुग्णालयात बीएमटी केली जाते, मात्र तेथे एकच बेड उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara DJ Dolby Action : पोलिसांची कारवाई चुकीचीच! साताऱ्यात डीजे जप्त झाल्यानंतर उदयनराजेंनी थेट घेतली डॉल्बी चालकांची बाजू; पालकमंत्री देसाईंची भूमिका काय?

‘आईला सोडून कसा जाऊ? आधी तिला बाहेर काढतो’... शेवटपर्यंत झुंजला, अखेर बस आगीत माय-लेकाचा मृत्यू; अंगठीवरून पटली ओळख

Lalbaugcha Raja Visarjan 2026 : लालबागच्या राजाच्या विसर्जनाला यंदाही होणार विलंब? गिरगाव चौपाटीवरील 'त्या' नैसर्गिक कारणामुळे वाढली चिंता; प्रशासनासमोर मोठं आव्हान

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात गणपती विसर्जन मिरवणुकीत सतेज पाटलांनी डीजेच्या तालावर धरला ठेका; व्हिडिओ व्हायरल

‘तुम्हाला काय प्रॉब्लेम?’ सततच्या चर्चांवर गोविंदांचा सवाल; म्हणाला...‘माझ्या खासगी आयुष्याचा तमाशा करू नका’

SCROLL FOR NEXT