मुंबई

अपुऱ्या पाणीपुरवठाची विधानसभा अध्यक्षांकडून दखल

CD

अपुऱ्या पाणीपुरवठ्याची विधानसभा अध्यक्षांकडून दखल

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : मुंबईत कमी दाबाने आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या तक्रारी वाढत असून मुंबईकर हैराण झाले आहेत. याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या दालनात शुक्रवारी (ता. ५) तातडीची बैठक बोलावली आहे.

विधानसभेत बुधवारी (ता. ३) आमदार ॲड. आशीष शेलार यांनी वांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्रातील खारदांडा, गझदरबांध आणि वांद्रे परिसरातील पाणीपुरवठ्याच्या तक्रारी मांडल्या. मुंबई महापालिकेत सत्ताधाऱ्यांनी मुंबईकरांना २४ तास पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात दोन तासही पाणी मिळत नाही. वांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्रात २४ तास पाणीपुरवठ्याचा पायलट प्रकल्प राबविण्यात आला. तो पूर्ण अपयशी ठरला, त्यामुळे आता एक तासभरही पाणी मिळत नसल्यामुळे रहिवाशांमध्ये असंतोष आहे. मुंबईच्या सगळ्याच भागात याबाबत तक्रारी असल्याचे शेलार यांनी लक्ष वेधले. त्याला मुंबईतील अन्य आमदारांनी पाठिंबा दिला. याची दखल घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुंबई महापालिका जल अभियंत्यांनी तातडीने मुंबईतील पाणीपुरवठ्याची माहिती संबंधित मंत्र्यांमार्फत सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच, शुक्रवारी आमदार, पालिका अधिकारी आणि संबंधित मंत्री यांची बैठक विधानभवनात आपल्या दालनात घेण्यात येईल, अशी घोषणा राहुल नार्वेकर यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Mandir: इस्रोच्या मदतीने रामललाचा अलौकिक 'सूर्याभिषेक'! ४ मिनिटे कपाळावर चमकली सूर्याची किरणे

Meta Brain : माणसाचा मेंदू कॉपी करत आहे Meta! बनवला 'डिजिटल ब्रेन'; जो पाहू अन् ऐकू शकतो, आता मशीन समजून घेणार तुमच्या भावना

Ashok Kharat Nashik : अशोक खरातसोबत नाशिकचा बडा नेता, अनिसकडून गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : येवला बाजार समिती सहा दिवस बंद, कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत

PSL 2026 : पाकिस्ताच्या मुश्ताक अहमदचा उद्धटपणा... Live TV वर इंग्लंडच्या खेळाडूची लाज काढायला गेला अन् मग... Video Viral

SCROLL FOR NEXT