मुंबई

अवघ्या २२ सेकंदाचा सिग्नलमुळे प्रवाशी त्रस्त

CD

अवघ्या २२ सेकंदांच्या सिग्नलमुळे प्रवासी त्रस्त

शिवडी, ता. ३ (बातमीदार) : दक्षिण मध्य मुंबईमधील सर्वाधिक वर्दळीचे ठिकाण म्हणून लालबाग येथील रणवीर सदन बी. ए. रोड ओळखले जाते; मात्र या ठिकाणी उभारण्यात आलेल्या सिग्नल यंत्रणेला अवघ्या २२ सेकंदाचा सिग्नल असल्यामुळे येथून पादचारी व इतर प्रवाशांना रस्ता ओलांडणे जिकिरीचे झाले आहे. कमी वेळेचा सिग्नल, त्यातच त्या ठिकाणी वाहतूक पोलिस नाही आणि सीसीटीव्ही कॅमेरादेखील नाही. त्यामुळे सिग्नल यंत्रणेलाही न जुमानता येथून वाहने सुसाट धावत असल्याने अनेकदा अपघात झाले आहेत. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरा, गतिरोधक असावा, अशी मागणी येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे. याबाबत अखिल भारतीय मराठा महासंघ दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र तावडे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार गुरुवारी (ता. २७) वाहतूक विभागाच्या वतीने येथील सिंग्नल यंत्रणा व रस्त्याची पाहणी करण्यात आली.
कायम गजबजलेल्या लालबाग विभागातील बी. ए. रोड येथील सिग्नलची समस्या लक्षात घेऊन महेंद्र तावडे यांनी मनपा एफ दक्षिण देखभाल विभागाला लेखी पत्र दिले होते. त्यानुसार वाहतूक विभागाकडून पोलिस निरीक्षक अशोक लांडगे यांनी नुकतीच पाहणी केली. त्यानंतर त्यांनी हा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT