मुंबई

कल्याण पूर्वेमध्ये मतदार नोंदणी अभियान

CD

कल्याण पूर्वमध्ये मतदार नोंदणी अभियान
कल्याण, ता. ४ (वार्ताहर) : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ऐन निवडणुकीच्या दिवशी कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील सुमारे ८० हजार मतदारांची नावे गायब झाल्याची बाब निदर्शनास आली होती. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालांडे यांनी मतदार नाव नोंदणी अभियान राबविले आहे. कल्याण पूर्वमध्ये हे मतदार नाव नोंदणी अभियान राबविले जात आहे. या अभियानाचा प्रारंभ बुधवारी ठाकरे गटाच्या कोळसेवाडी येथील मध्यवर्ती शाखेतून करण्यात आला.
यावेळी हर्षवर्धन पालांडे यांच्यासह माजी महापौर रमेश जाधव, शहरप्रमुख शरद पाटील, नारायण पाटील, हेमंत चौधरी, शांताराम दिघे, चंद्र प्रसाद, सूर्यकांत मोरे, जगदीश तरे, तुळशीराम म्हात्रे, मीना माळवे, साधना पार्टे, संगीता गांधी, दीपाली जाधव, अक्षदा कदम, संध्या केळमकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारांची मतदार यादीतून नावे अचानकपणे गायब झाली आहेत, अशा मतदारांना आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करून घेण्यासाठी ही संधी उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती यावेळी पालांडे यांनी दिली. यावेळी माजी महापौर रमेश जाधव यांनी निवडणूक आयोगाच्या गलथान कारभारामुळेच मतदारांची नावे यादीतून गायब झाल्याचे सांगितले, तसेच शहरप्रमुख शरद पाटील यांनी या अभियानाचा जास्तीत लाभ घेण्याचेही आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Savings: 10 रुपयांची बचत करून पती-पत्नी वर्षभरात करतील 1 लाखांचा फंड! ना SIP, ना शेअर मार्केट; काय आहे हे चॅलेंज?

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण! आमदारपुत्र रोहित गावितला चार दिवसांची पोलीस कोठडी; काल मीरा रोडवरून घेतले होते ताब्यात

Girna Dam Water Storage : नाशिक अन् गुजरातच्या पावसाने गिरणा धरण फुल्ल! 21 हजार हेक्टर शेती फुलणार; काय आहे ताजी स्थिती?

गणपती बसवायचा आणि १५ सप्टेंबरला मुंबईला जायचं; मराठ्यांचं वादळ मुंबईत कधी धडकणार?

Marathi News Live Updates : पुढील २४ तास विदर्भात पावसाची शक्यता,३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT