मुंबई

पोक्सो गुन्ह्यातील दोघांना २० वर्षांचा कारावास

CD

पोक्सो गुन्ह्यातील दोघांना २० वर्षांचा कारावास
ठाणे सत्र न्यायालयाचा निकाल, धमकी देऊन अत्याचार

ठाणे शहर, ता. ४ (बातमीदार) : अल्पवयीन मुलीला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या दोघांना ठाणे सत्र न्यायालयाने २० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. या गुन्ह्यातील आरोपींची नावे नरेश विखे आणि विजय तांबे अशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. राबोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाच वर्षांपूर्वी हा गुन्हा घडला होता.

कळवा येथे राहणाऱ्या बारा वर्षीय मुलीला खाऊचे आमिष दाखवून साकेत येथील नाना-नानी पार्क परिसरातील पाईपलाईन येथील झोपडपट्टीत घेऊन जाऊन नरेश अशोक विखे ऊर्फ दादू (वय २७) आणि विजय बाबासाहेब तांबे ऊर्फ विजू (वय २५) यांनी अत्याचार केला होता. काही दिवसांनी तिला पुन्हा धमकी देऊन दोघांकडून पुन्हा अत्याचार करण्यात आला होता. ही घटना घडल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला व ९ डिसेंबर २०१९ रोजी राबोडी पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन आरोपींविरोधात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. त्यावर शनिवारी (ता. २९) अंतिम सुनावणी झाली. पोक्सो न्यायालयाकडून न्यायालयात सादर केलेले साक्षी पुराव्यांना ग्राह्य मानून दोघांनाही २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावून २६ हजार रुपयांचा दंड करण्यात आला. या दंडाची रक्कम न भरल्यास शिक्षेत आणखी एक वर्षाची वाढ होईल, असेही आदेश न्या. मालवणकर यांनी दिले. या गुन्ह्याचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक पद्मजा यादव यांनी केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT