मुंबई

बांधकामाचे साहित्य रस्त्यावर

CD

बांधकामाचे साहित्य रस्त्यावर
कांदिवली पूर्वेत वाहनचालक; प्रवासी हैराण
कांदिवली, ता. ४ (बातमीदार) ः कांदिवली पूर्वेला द्रुतगती मार्गावर समता नगर पादचारी पुलाशेजारी बस थांबा आहे. या बस थांब्‍याशेजारी बांधकामाचे साहित्‍य, रेतीचे ढिगारे साचल्‍याने प्रवाशांची गैरसोय सुरू आहे.
प्रवाशांना द्रुतगती मार्गावर उभे राहून बसची वाट पहावी लागते. पालिकेने आणि संबंधित विभागाने तातडीने स्वच्छता करून प्रवाशांना होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.
एसटी, बेस्ट, खाजगी बस थांबा इथे असल्‍याने प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. मात्र, बस थांब्याकडे येणाऱ्या मार्गावर पादचारी पुलाच्या बाजूला खडी, तुटलेल्या लाद्या, रेती, म्हाडाच्या बांधकामाच्या टाक्या रस्त्यावरच असल्याने पावसात प्रवाशांचे हाल होत आहेत. इथे एखाद्या अपघाताची भीती वर्तवण्यात येत आहे. बस थांब्याच्या पाठीमागे डोंगर आहे. म्हाडा व्यवस्थापनाकडून या डोंगरावर खोदकाम करून तटभिंती बांधण्याचे काम पावसाळ्यात थांबविण्यात आले आहे. मात्र बांधकामातील साहित्य बस थांब्‍यालगत ठेवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cristiano Ronaldo : भावनिक क्षण! ख्रिस्तियानो रोनाल्डो रडला... मैदानावर एकटा उभा राहिला; फुटबॉलविश्व स्तब्ध Video

Portugal vs Spain : स्वप्न तुटले! ख्रिस्तियानो रोनाल्डोचा वर्ल्ड कप प्रवास संपला! पोर्तुगालला माजी विजेत्या स्पेनकडून पराभवाचा धक्का

Pune Heavy Rain : पुणेकर त्रस्त; यंत्रणा मात्र सुस्त, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेला उशिरा जाग

LPG import updates: 'एलपीजी'बाबत सरकारने प्लॅन बदलला! अमेरिकेसोबत मोठा निर्णय, गॅसचं संकट टळणार

Pune Heavy Rain : पावसाने दाणादाण! जनजीवन विस्कळित, घरांसह दुकानांमध्ये शिरले पाणी

SCROLL FOR NEXT