मुंबई

मीटर बॉक्स खरेदीवरून आरोप

CD

मुंबई, ता. ४ : महावितरणने २०२१ मध्ये खरेदी केलेल्या मल्टी मीटर बॉक्समध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप विधान परिषदेतील काही आमदारांनी केला आहे, मात्र नियमानुसारच मीटर खरेदी केल्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
महावितरणने २०२१ मध्ये जवळपास ६४ हजार मल्टी मीटर बॉक्सची खरेदी केली आहे. या मीटर बॉक्सची किंमत आठ हजार रुपये असताना संबंधित संचालकाने जयपूर येथील आरएमसी स्वीच गियर या कंपनीची निविदा मंजूर करून १४ हजारांना खरेदी केली आहे. यामध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत आमदार गोपीचंद पडळकर, विलास पोतनीस यांनी चौकशीची मागणी केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याऐवजी त्याला अधीक्षक अभियंता पदावर पदोन्नती दिल्याची बाब निदर्शनास आणली. यावर उत्तर देताना ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच मल्टी मीटर बॉक्सचा दर १३ हजार ९५१ रुपये आहे, मात्र महावितरणने मागवलेल्या निविदेत आरएमसी कंपनीने १२ हजार ९८६ रुपये एवढ्या सर्वात कमी दराची निविदा भरली होती. त्यामुळे त्यांच्याकडून खरेदी केल्याचे स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT