मुंबई

पालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांना निकृष्ट पोषण आहार?

CD

पालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांना निकृष्ट पोषण आहार?
दिवा, ता. ४ (बातमीदार) : महापालिकेच्या शाळेत दिले जाणारे जेवण हे निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत पालकांनी शाळेत जाऊन जेवण तपासले. तसेच ते जेवण निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप पालिकांना केला. या वेळी दिवा पालिका शाळेतील विद्यार्थ्यांचे १० ते १५ पालक उपस्थित होते.
महापालिकेची शाळा सुरू होऊन अवघे १९ दिवस झाले आहेत; मात्र शाळेतील जेवण चांगले नसल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी वाढल्याने गुरुवारी (ता. ४) पालकांनी जेवणाची तपासणी केली. तेथे जेवण तपासले असता डाळीला फेस आल्याचे त्यांना आढळले; तर भात कच्चा शिजलेला होता. तसेच तेथे लहान मुलांना देण्यात येणाऱ्या लाडवाच्या पाकिटावर एक्सपायरी डेट नसल्याचा आरोप पालिकांनी केला.
जेवण बनवताना एका निळ्या टाकीतील अशुद्ध पाणी वापरले जाते. डाळ, उसळसाठी पाम तेलाचा वापर केला जात आहे; तर भातही कच्चा शिजवला जातो. हे असे निकृष्ट दर्जाचे अन्न खाऊन मुले आजारी पडत आहेत. दिव्यातील पालिका शाळेत निकृष्ट जेवण देऊन आमच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप पालिकांनी केला. तसेच जेवणात याआधीही केस, झुरळ, भांडी घासायच्या काथ्याची तार सापडल्याने काही मुले शाळेतील जेवतच नाहीत. यावर पालकांनी शिक्षकांकडे तक्रार केल्यावर आम्ही ठेकेदाराला सांगतो, इतके उत्तर शाळा प्रशासनाकडून दिले जाते. या निकृष्ट जेवणामुळे मुलांमध्ये पोटदुखी, उलटी, जुलाब, घशाला खवखव होणे, मळमळणे असे आजार होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. या वेळी श्रावणी कदम, जानवी परब, सुवर्णा बांदेकर, उदय कांबळे, दिलीप शिगम यांसह इतर पालक या वेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंखा लावण्यावरून वाद; महाराष्ट्रातील मोठ्या विद्यापीठात तरुणीचं विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य, पोलिसांवरही दबाव...

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

Flight Guidelines: विमानाच्या उड्डाणासाठी नवे नियम जाहीर! पायलटचा निर्णय अंतिम असणार; दबाव टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई

Katraj News : भारती विद्यापीठ भागात हॉटेलमध्ये गॅस गळतीमुळे भडका; चारजण जखमी

Manchar Crime : मंचर येथे प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांना दोन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले; एसीबीची कारवाई

SCROLL FOR NEXT