मुंबई

कंटेनर अंगावर पडून कामगार ठार

CD

कंटेनर अंगावर
पडून कामगार ठार
ाजासई कंटेनर यार्डमधील घटना
नवी मुंबई, ता. ४ (वार्ताहर) : जासई येथील इपिक ग्लोबल सर्व्हिसेसच्या कंटेनर यार्डमध्ये कंटेनर अंगावर पडून कामगाराचा चिरडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. संदीप चौरसिया असे मृत कामगाराचे नाव आहे. कलमारचालकाच्या निष्काळजीमुळे ही घटना घडल्याचे आढळल्यानंतर उरण पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.
ट्रेलरचालक असलेला संतोष आंधळे हा बुधवारी रात्री ८.३० वाजता कंटेनर यार्डमध्ये रिकामा कंटेनर ठेवण्यासाठी गेला होता. यावेळी कलमारचालक शिशिर खालखो हा ट्रेलरवरील रिकामा कंटेनर उचलून तो बाजूला ठेवत होता. त्याचवेळी कलमारच्या उजव्या बाजूचे लॉक तुटल्याने हा कंटेनर खाली उभ्या असलेल्या कामगार संदीप चौरसिया याच्या अंगावर पडला. त्याखाली चिरडून त्याचा जागीच मृत्यू झाला. उरण पोलिसांनी या घटनेला जबाबदार धरून खालखो याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सलग दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त! RBIच्या मोठ्या निर्णयाआधी उलटफेर; जाणून घ्या आजचा ताजा भाव

९ पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावलेलं प्रकरण काय होतं? कोर्टाने का म्हटलं ‘दुर्मिळातील दुर्मिळ घटना’?

'या' ग्लॅमरस मराठी अभिनेत्रींचं दुसरं लग्न चर्चेत; एका अभिनेत्रीची प्रेमकहाणी आहे भन्नाट!

Nagpur Crime: नागपूर हादरलं! चप्पल अदलाबदलीच्या वादातून युवकाची हत्या... चार आरोपी अटकेत

Pune Tanker Accident : वानवडीत पाण्याच्या टँकरच्या धडकेत 24 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू; डोकं चाकाखाली चिरडलं, चालक स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर

SCROLL FOR NEXT