मुंबई

फेरीवाल्यांवरील कारवाई तात्काळ थांबवा

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ ः राज्य सरकारने ठोस धोरण आखल्याशिवाय भरपावसाळ्यात फेरीवाल्यांवर सुरू केलेली कारवाई तत्काळ थांबवावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. यावेळी कारवाईत पात्र फेरीवाल्यांना हटवले जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
मुंबईसह राज्यातील इतर शहरात अंदाजे ३० लाख फेरीवाले आहेत; पण त्यांच्यासाठी ठोस धोरण नसल्याने आजही ते त्यांच्या हक्कांपासून वंचित आहेत. २०१४ साली लोकसभेने फेरीवाल्यांसदर्भात कायदा केला. सर्व राज्यांनी फेरीवाला धोरण आखणे अपेक्षित होते, परंतु १० वर्षांनंतरही राज्यात फेरीवाल्यांसाठी ठोस धोरण नाही. केवळ योजना नसल्याने फेरीवाल्यांना अमानुष वागणूक मिळत असल्याने ही कारवाई तातडीने थांबवण्याची मागणी नाना पटोले यांनी विधानसभेत केली, तसेच पावसाळा सुरू असताना त्यांच्यावरील कारवाई अन्यायकारक असून केंद्र सरकारप्रमाणे राज्यात जोपर्यंत फेरीवाल्यांना कायदेशीर संरक्षण मिळत नाही; तोपर्यंत कारवाई थांबवण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, असे पटोले यांनी सांगितले.
-------------------------------------
फेरीवाल्यांची परिस्थिती अवघड झालेली आहे. सरकार एकीकडे फेरीवाल्यांना १० हजार रुपयांचे कर्ज देते आणि त्यांच्याच दुकानावर कारवाई केली जाते. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंगळवारी या मुद्यावर चर्चा घडवून आणणार आहे.
- राहुल नार्वेकर, विधानसभा अध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं उच्चांकापासून 26 हजारांनी स्वस्त! पाहा ताजा भाव; पुढे सणासुदीच्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?

MPSC Exam Success Story : शेतकरी बापाची लेक अन् आई पोलिसात! जाधववाडीच्या निकिताची MPSC मध्ये गगनभरारी, महसूल सहाय्यकपदी निवड

Caste Validity Certificate : जातवैधता प्रमाणपत्राचा आग्रह न धरता तात्पुरता प्रवेश द्या; उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

Rajendra Yadravkar : गोकुळ प्रचारावेळी यड्रावकरांच्या ताफ्याला सैनिक टाकळीत काळे झेंडे; प्रस्तावित एमआयडीसीविरोधात संताप, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT