मुंबई

उत्तर प्रदेशतील फरार आरोपीला अटक

CD

उत्तर प्रदेशतील फरार आरोपीला अटक
पनवेल, ता. ५ (वार्ताहर) : खुनाच्या प्रयत्नाचे दोन गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी बदलापूर येथून अटक केली आहे. उत्तर प्रदेश राज्यातून तो दोन वर्षांपासून फरार होता. गौतम निर्मलप्रसाद गौड (वय ३२) असे या आरोपीचे नाव असून उत्तर प्रदेश सरकारने त्याच्यावर ५० हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते. उत्तर प्रदेश पोलिसांचे पथक त्याला घेऊन जाण्यासाठी नवी मुंबईत दाखल झाले आहे.

आरोपी गौड याने २०२२ मध्ये गोरखपूर जिल्ह्यात खुनाच्या प्रयत्नाचे दोन गुन्हे केले होते. त्याच्या विरोधात स्थानिक झंगहा पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला होता, मात्र त्यानंतर आरोपी फरार झाला होता. तेव्हापासून उत्तर प्रदेश पोलिस त्याच्या मागावर होते. पोलिसांनी त्याच्यावर ५० हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. सध्या तो बदलापूर येथे राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गोरखपूर येथील ‘एसटीएफ’चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यप्रकाश सिंग यांनी याबाबत पनवेल शहर पोलिसांना फोनद्वारे कळविले. आरोपीने पनवेल तसेच नवी मुंबई भागात काही गुन्हे केले असल्याची शक्यता असल्याने परिमंडळ-२चे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या सूचनेनुसार पनवेल शहर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल केदार यांच्या पथकाने बदलापूर येथे सापळा रचत त्याला ताब्यात घेतले. आरोपीला पनवेल येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने त्याची तळोजा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

..
उत्तर प्रदेश पोलिस नवी मुंबईत दाखल
उत्तर प्रदेश पोलिसांचे एक पथक गुरुवारी नवी मुंबईत दाखल झाले असून पनवेल शहर पोलिसांच्या मदतीने आरोपी गौतम गोड याचा ट्रान्सिट रिमांड मिळवून त्याला उत्तर प्रदेश येथे नेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Live Update: PNG गॅस आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या स्थितीबाबत उच्चस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT