मुंबई

आंबेडकर मुलांच्या वसतिगृहासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

CD

आंबेडकर मुलांच्या वसतिगृहासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू
पालघर, ता. ६ (बातमीदार) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह चालविले जाते. यासाठी वसईतील रमेदी येथे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशप्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे. हे प्रवेश अर्ज विद्यार्थ्यांना सहायक आयुक्त, समाजकल्याण, पालघर, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह रमेदी, वसई येथून विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी वसतिगृहातील प्रवर्गनिहाय पुढीलप्रमाणे जागा रिक्त आहेत. अनुसूचित जाती ३४, आर्थिकदृष्ट्या मागास व इतर मागास प्रवर्गासाठी एक, विशेष मागासवर्ग-प्रवर्गासाठी दोन, दिव्यांग एक व अनाथ एक याप्रमाणे जागा असून प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे. या वसतिगृहामध्ये दहावी व अकरावीनंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) अर्ज करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत १२ ऑगस्ट रोजी, रिक्त जागेवर प्रतीक्षायादीतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार निवड यादी १५ ऑगस्ट तर दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना २२ ऑगस्टपर्यंत प्रवेश देण्यात येणार आहेत. तसेच, बीए, बीकॉम, बीएस्सी व बारावीनंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदविका, पदवी आणि एमए, एमकॉम, एमएस्सी या पदवीनंतरच्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन प्रवेश अर्ज करण्याचा कालावधी ३१ जुलैपर्यंत देण्यात आला आहे. तसेच, याबाबत अधिक माहितीसाठी समाजकल्याण विभागाच्या मुकुल विचारे यांना संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT