मुंबई

मुंबई-नाशिक महामार्गाची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी खासदार रस्त्यावर Video Viral

Suresh Balya mama Mhatre: खासदार म्हात्रेंकडून पाहणी, बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करणार

CD

भिवंडी, ता. ६ (बातमीदार) : भिवंडी शहर व ग्रामीण भागात रोजच्या वाहतूक कोंडीची समस्या नागरिकांची डोकेदुखी ठरली आहे. यामुळे येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा यांनी गुरुवारी (ता. ४) वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह मुंबई-नाशिक महामार्गाची पाहणी केली. यावेळी खासदार म्हात्रे यांनी बेजबाबदार ठेकेदारांवर कठोर कारवाई करणार असून त्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

खारेगाव, हायवे दिवा, मानकोली ओवळी, रांजनोली नाका ते वडपापर्यंतच्या रस्त्याची पाहणी करून चर्चा करण्यात आली. या महामार्गावर अपूर्ण कामांची पाहणी करून त्यावर तत्काळ उपाययोजना राबवण्याच्या सूचना खासदार म्हात्रे यांनी वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
भिवंडीतील वाहतूक कोंडीवर पर्याय काढण्यासाठी व त्यावर उपाय काढण्यासाठी झालेल्या पाहणी दौऱ्यावेळी वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. विनीत राठोड, एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता सुभाष बोरसे, ठेकेदार यांच्यासह वाहतूक विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

भिवंडीत मागील आठ दिवसांपासून होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना तीन ते चार तास वाहतुकीत अडकून पडावे लागत आहे. याचा फटका चाकरमान्यांसह शालेय विद्यार्थ्यांनादेखील बसला आहे. मुंबई-नाशिक महामार्गासह भिवंडी-ठाणे महामार्ग व मानकोली, अंजूर फाटा, चिंचोटी महामार्गावरीलही वाहतूक कोंडीसाठी उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत.

महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त डॉ. विनीत राठोड यांनी रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी अवजड वाहनांच्या वाहतुकीवर वेळेनुसार नियंत्रण व नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
रुंदीकरणाच्या ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याची कामे अपूर्ण असून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ठेकेदारांकडून ही कामे अपूर्ण ठेवली जात आहेत. यामध्ये काही अधिकाऱ्यांचाही सहभाग असून अशा बेजबाबदार ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ'ची दादागिरी संपणार? पुतीन यांची भारताला मोठी ऑफर! दोन्ही देशांना सापडला नवा व्यापारी मार्ग

Charas Seized : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक कोटींचे चरस जप्त; बँकॉकहून आलेल्या महिला प्रवाशाकडून कॉस्मेटिकच्या डब्यांतून तस्करी

Lohgaon News : लोहगाव अत्याचार प्रकरण; आरोपीला कठोर शिक्षेची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

Nagpur Crime : अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून; आरोपीला अटक, दोन महिन्यांपूर्वी आला होता कारागृहातून सुटून

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

SCROLL FOR NEXT