मुंबई

ड्रग्स,चरस,गांजा याच्या विरोधात निदर्शने

CD

अमली पदार्थांविरोधात निदर्शने
धारावी, ता. ६ (बातमीदार) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार धारावी तालुका यांच्या वतीने ड्रग्स, चरस, गांजा अशा अमली पदार्थांविरोधात निदर्शने केली. व्यसनांमुळे तरुण पिढी बरबाद होत आहे. त्‍यामुळे राज्य सरकार विरोधात मंगळवारी (ता. २) दुपारी १२ वाजता शीव रेल्वेस्थानकासमोरील लाल बहाद्दूर मार्गावरील सागर हॉटेलसमोर तालुका अध्यक्ष उलेश गजाकोश यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करण्यात आली. अमली पदार्थांमुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढीस लागले आहे. महाविद्यालय, शाळा व सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर ड्रग्स मिळत असल्याने विद्यार्थी उद्‌ध्वस्‍त होत आहे. याकडे सत्ताधारी पक्षांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गजाकोश यांनी यावेळी केला. सरकारविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सरकारने लवकरात लवकर यावर पावले उचलावीत, अन्यथा यापेक्षा उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनस्थळी, युथ तालुका अध्यक्ष इम्रान खान, महिला तालुका अध्यक्ष हलीमा अन्सारी, वॉर्ड अध्यक्ष गोरा खान, रईस खान, राजू टोणपे, राजू होटकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जिम बंद केलं, आठवड्यात साहित्य विकायचं होतं, दगडूशेठ मदतीला धावला... 'कृष्णाईच्या लेकी' अभिनेत्याने सांगितला अनुभव

Gangapur Maize Crop Crisis : करपलेली मका मुरघाससाठी विकण्याची वेळ ; उत्पादन खर्चही निघणे कठीण; पश्चिम महाराष्ट्र-कर्नाटकातून चाऱ्यासाठी मागणी

Maharashtra Ganesh Visarjan Live: मुंबई-पुण्यात गणेश विसर्जनाची लगबग; वाहतुकीपासून मिरवणुकीपर्यंत प्रत्येक अपडेट LIVE

Kolhapur Mumbai Special Train : दिवाळीत गावी जाणाऱ्यांसाठी खूशखबर! मध्य रेल्वेकडून कोल्हापूर ते मुंबई, कलबुर्गीसाठी विशेष गाड्या जाहीर; पाहा रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक

Gyanesh Kumar Petition : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत वाढ; थेट कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल, 'ते' 14 निर्णय वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT