मुंबई

लेखन माणसाला आत्मनिर्भर बनविते : नमिता कीर

CD

लेखन माणसाला आत्मनिर्भर बनविते
नमिता कीर, कोकण मराठीतर्फे ‘तिचा सन्मान’ कार्यक्रम

ठाणे, ता. ६ : लेखन माणसाला आपल्या आतल्या ‘मी’ चा शोध घेऊन आत्मबळ देते आणि आत्मनिर्भर बनविते. आजच्या ज्या तीन सत्कारमूर्ती आहेत, त्यांच्यातील लिखाणाच्या सवयीमुळेच त्या समाजासमोर व्यक्त होऊ शकल्या, असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांनी केले. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे जिल्हा महिला समिती आणि शारदा एज्युकेशन ट्रस्ट यांच्यावतीने ‘तिचा सन्मान’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
दक्षिण आफ्रिकेतील किलोमांजारो हे जगातले पाचव्या क्रमांकाचे शिखर काबीज करणाऱ्या पहिल्या महिला हा मान मिळवणाऱ्या अमृता भालेराव, ठाण्याच्या डेप्युटी कमिशनर आणि कवयित्री व गायिका रुपाली अंबुरे मॅडम आणि अंध बँक कर्मचारी व अंध व्यक्तींसाठी भरघोस कार्य करणाऱ्या अनुजा संखे या महिलांचा यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. मेधा मेहेंदळे, डॉ. विधीता लिखिते, कोमसापचे जिल्हा अध्यक्ष बाळ कांदळकर, महिला समिती अध्यक्ष नितल वढावकर उपस्थित होत्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष बाळ कांदळकर यांनी ज्या महिलांचा गौरव करण्यात आला, त्यावेळी त्यांचा गौरव केला.
ठाण्याच्या पोलिस उपायुक्त रुपाली अंबुरे यांनी आजोबांनी लावलेल्या वाचनाची सवय आणि त्यानंतर अमेरिकेला जाऊन घेतलेल्या वैद्यकीय शिक्षणाचा प्रवास सांगितला. त्यानंतर पोलिस दलातील सेवा आणि गुन्हेगारीच्या विश्वाचे त्यांनी अनुभव सांगितले. किलोमांजरी हे दक्षिण आफ्रिकेतील शिखर काबीज करणारी पहिली महिला अमृता भालेराव यांनी शिखर कसे काबीज केले हे रोमांचकारी पद्धतीने सांगितले; तर अंध बँक अधिकारी अनुजा संखे यांनी आपल्या अंधत्वावर मात करून बँक अधिकारी होण्याचा प्रवास मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तपस्वी नेवे यांनी, तर कोमसाप ठाणे जिल्हा महिला प्रमुख नितल वढावकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Plane: मोठा अपघात! कॅनडा एक्सप्रेस विमानाला अग्निशमन दलाच्या ट्रकची जोरदार धडक; २ जणांचा मृत्यू, ७० हून अधिक प्रवासी जखमी

Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील हस्तक्षेप भोवला, पोलिस अधीक्षक तुषार दोषींसह १०० पोलिसांच्या निलंबनाचे आदेश

Uttar Pradesh: UP ATS चा धडाका! देवबंदमध्ये मोठी कारवाई; संशयास्पद व्हिडिओ आणि इराण-पाकिस्तान कनेक्शनची चर्चा

Premium|Artificial Intelligence Investment : एआय गुंतवणुकीतून आयटी क्षेत्राला धक्का; भारतीय कंपन्यांसमोर आव्हान

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या KKR संघात विदर्भाच्या पठ्ठ्याला मिळाली संधी; 'या' टीम इंडियाच्या गोलंदाजाच्या जागेवर खेळणार

SCROLL FOR NEXT