मुंबई

सरकारी यंत्रणादेखील एसआरए योजनेत येणार

CD

सरकारी यंत्रणादेखील एसआरए योजनेत येणार
देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई, ता. ६ : एसआरए योजनांसाठी खासगी विकसकांबरोबरच म्हाडा, सिडको, मुंबई महापालिका, एमएमआरडीए आदी सरकारी यंत्रणांनीदेखील पुढे यावे, असा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत घेण्यात आला. त्याची कार्यवाही त्वरित करण्यात येईल, अशी माहितीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता. ५) विधान परिषदेत दिली.
विधान परिषदेत भाई गिरकर यांनी झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी चर्चेत सहभागी होत भाजप गटनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, उपमुख्यमंत्र्यांनी थकलेली भाडी देण्यासंदर्भात भूमिका घेतल्यानंतर मुंबईत बऱ्याच ठिकाणी सर्वसामान्य रहिवाशांची भाड्याची रक्कम होती ती काही अंशी मिळत आहे; परंतु बहुतांशी ठिकाणी बिल्डर भाडी देत नाहीत, त्यामुळे हजारोंच्या संख्येने लोक अस्वस्थ आहेत. काहींना भाडे नाही म्हणून घरमालक घरातून बाहेर काढत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. त्यामुळे आदेशाची कठोर अंमलबजावणी व्हावी, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

किचकट अटी-शर्ती कमी कराव्यात

मृत सदनिकाधारकांच्या वारसांना अर्ज करण्यासाठी किचकट अटी-शर्ती आहेत, त्यामुळे या वारसांना त्रास होत असल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले. त्यावर उत्तर देताना गृहनिर्माणमंत्री अतुल सावे म्हणाले की, वारसा हक्क असलेल्यांनी वारसा प्रमाणपत्र दिले तर विभाग तत्काळ ते दाखल करून घेतो. तसेच, ४५ दिवसांत ना-हरकत प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, यासाठी पुढील महिन्याभरात ऑनलाईन प्रक्रिया सुरू होत असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

६ महिन्यांच्या चिमुकल्यावर कुत्र्याचा हल्ला, पिटबुल नव्हे तर American Bully; मालक म्हणाला, उपचारावर ४ लाख खर्च केले

Ajit Agarkar Salary : अजित आगरकरने BCCI कडून किती पगार घेतला? त्याच्या कार्यकाळात भारताची कामगिरी कशी झाली? Report Card

Lek Ladki Scheme : ‘लाडक्या लेकीं ’च्या पैशांवरही डल्ला! बीडमधील प्रकार, अधिकारी म्हणतात ३५९ मुलींच्या नावे दुबार निधी गेला

Latest Marathi News Update : सोने दरात आणखी वाढ, सोने दिड लाखांवर

Free Registration of 50 Lakh Rural Properties: पंतप्रधानांच्या वाढदिवशी 'स्वामित्व योजने'ने गावकऱ्यांना दिला मालकी हक्क! ५० लाख ग्रामीण संपत्तींची मोफत रजिस्ट्री

SCROLL FOR NEXT