मुंबई

चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी धडक मोर्चा

CD

चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
मुंबादेवी, ता. ७ (बातमीदार) : राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे राज्‍य सरकारचे दुर्लक्ष होत असल्‍याने २३ जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मध्यान्ह भोजन वेळेमध्ये निदर्शने करण्यात येणार आहेत. तरीही सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्‍यास २५ जुलै रोजी आझाद मैदानात राज्यव्यापी धडक मोर्चा आणू, असा इशारा राज्य सरकारी गट-ड चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ महाराष्ट्र या संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे झालेल्‍या पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी त्यांच्यासोबत कार्याध्यक्ष भिकू साळुंखे, सरचिटणीस बाबाराम कदम, सुरेश आहेरकर, सुरेखा चव्हाण, मार्तंड राक्षे, गुरुदत्त वाडेकर उपस्थित होते. भाऊसाहेब पठाण पुढे म्हणाले, सरकारने महाराष्ट्रात साडेचार लाख रिक्त पदांपैकी फक्त एक लाख जागांवर भरती केली आहे. विशेष रून फक्त पोलिस भरती केली जाते आणि इतर जागेवर खासगी सेवेतर्फे ठेकेदारी पद्धतीने कर्मचारी भरले जातात. खासगी भरतीला आमचा कायम विरोध राहिला आहे. तसेच अनुकंपा भरतीदेखील पाच वर्षे झाली नाही. अनुकंपा प्रकरणात वयाची मर्यादा उलटून गेल्यावर त्यांना घेतले जात नाही, मग त्यांनी करायचे काय? असा सवाल पठाण यांनी उपस्थित केला.
अनुकंपा तत्त्वावर भरती विनाअट करून लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काच्या जागा तत्काळ भरून काढाव्यात. जुनी पेन्शन योजना सुरू करावी. पोलिस कर्मचाऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या कॅशलेस वैद्यकीय सेवांप्रमाणे सर्व विभागांतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सुविधा पुरवावी, या मागण्या असल्‍याचे पठाण यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : मोटार वाहन विभागावर ‘लक्ष्मीची कृपा’; महापालिकेकडून नवीन वाहने, यंत्रांच्या खरेदीवर ५८ कोटींचा निधी मंजूर

अग्रलेख : आभासी आनंद, खऱ्या वेदना!

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT