मुंबई

उल्हास, भातसा, भारंगी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

CD

भातसा, भारंगी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ७ : उल्हास खोरे आणि ठाणे जिल्ह्यातील सह्याद्री डोंगररांगेत रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास, भातसा, काळू, भारंगी नद्यांच्या पाणीपातळीत रविवारी रात्रीपासून वाढ झाली आहे.

कल्याण-डोंबिवली शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या मोहिली, मोहने येथील पाणीपुरवठा केंद्रांच्या समतल पाण्याची पातळी वाढली आहे. मोहने ते टिटवाळा परिसर जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या कठड्यांना पाणी लागले आहे. पाण्याच्या पातळीमुळे टिटवाळा भागातील सावरकरनगर भागातील वस्तीत रात्रीपासून पाणी शिरले आहे. हा परिसर नद्यांच्या समतल पातळीत येतो. रात्रीपासून रहिवाशांच्या घरातील पाणी उपसण्यासाठी व्यस्त आहेत. मुसळधार पाऊस सुरू राहिल्यास कल्याणमधील दुर्गाडी परिसरातील बाजारपेठ, बैलबाजार भागात पाणी घुसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे खाडीकिनारच्या रहिवाशांनी स्थलांतराची, तबेलेचालकांनी सावध राहून पाणीपातळी वाढली तर तबेल्यातून म्हशी बाहेर काढण्याची तयारी सुरू केली आहे. मुसळधार पावसामुळे पालिकेच्या आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.

भात लागवडीच्या कामांना वेग
माहुली किल्ला परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस पडल्याने सावरोली, शहापूर भागातून वाहणारी भारंगी नदी दुथडी वाहत आहेत. या नदीकिनाऱ्याच्या वस्तीत पाणी शिरले आहे. अनेकांची वाहने पाण्याखाली गेली आहेत. तर काहींच्या दुचाकी वाहून गेल्या आहेत. भातसा, काळू नद्यांच्या पात्रात वाढ झाली आहे. या मुसळधार पावसामुळे भात लागवडीच्या कामांना वेग आला आहे.

धरणाच्या पाणीपातळीत मात्र घट
रविवार सकाळपासून पावसाने उसंत घेतल्याने नद्यांच्या पाण्याच्या पातळीत घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. शहापूर तालुक्यातील भातसा, तानसा, वैतरणा, अप्पर वैतरणा, मोडकसागर या धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडला नसल्याने धरणांनी तळ गाठला आहे. या धरणांमधून मुंबईला पाणीपुरवठा केला जातो. धरणांमध्ये पाणी नसल्याने सध्या मृत साठ्यांमधून शहराला पाणीपुरवठा केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC rebels join BJP: 'तृणमूल'चे १७ बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर? NCPI नेत्याचं धक्कादायक विधान

Marathi News Live Updates : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राज्याच्या दर्शनाला

रेल्वेत कुटुंबियांसोबत बसण्यासाठी सीट बदलता येते का? जाणून घ्या रेल्वेचा नियम...

LONG LIFE HOROSCOPE: या’ 6 राशींच्या लोकांना मिळतं दीर्घायुष्याचं वरदान? 100 वर्षांनंतरही राहतात निरोगी, ज्योतिषशास्त्रात काय आहे कारण?

Wani News : मार्कंडेय पर्वतावर पुन्हा ‘बंदी’चा डोंगर! चार वर्षांत धोकादायक शिड्या-पायवाटांची दुरुस्ती नाही, भाविकांचा संताप

SCROLL FOR NEXT