मुंबई

वेगवेगळ्या अपघातात दोन दुचाकीचालकांचा मृत्यू

CD

वेगवेगळ्या अपघातात दोन दुचाकीचालकांचा मृत्यू

नवी मुंबई, ता. ७ (वार्ताहर) : जुना मुंबई-पुणे मार्गावर तसेच उरण फाटा ते उलवे मार्गावर शुक्रवारी (ता. ७) रात्री घडलेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू; तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली. पोलिसांनी या दोन्ही अपघातांना जबाबदार असलेल्या वाहनचालकांना ताब्यात घेतले आहे.

पनवेलमधील कोन गावाजवळ शुक्रवारी रात्री घडलेल्या पहिल्या अपघातात श्रीराम कन्नन पिल्लई (वय २९) हा तरुण आपला मित्र दीपेश धोने (वय २२) याच्यासोबत देवलोली येथून दुचाकीने पनवेलच्या दिशेने येत होता. या वेळी एका ट्रेलरचालकाने अचानक आपला ट्रेलर उजव्या बाजूला घेतल्याने श्रीराम याच्या दुचाकीला या ट्रेलरची धडक बसली. यामध्ये श्रीराम हा या ट्रेलरच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला. तर दिपेश हा जखमी झाला. या अपघातानंतर पनवेल तालुका पोलिसांनी ट्रेलरचालक जग्गू कोल याला ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्याच रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास बेलापूर येथील अपोलो हॉस्पिटलजवळ घडलेल्या दुसऱ्या अपघातात उमेश सिद्धेश्वर परिहार (वय ३४) याचा मृत्यू झाला. उमेश हा उरण फाटा येथून उलवे येथे दुचाकीने जात असताना रस्त्यालगत बंद स्थितीत उभ्या असलेल्या डम्परचा त्याला अंदाज न आल्याने त्याने या डम्परला दुचाकीसह धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी डम्परचालक राजेशकुमार सोनी याच्याविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? २० वर्षे जुनं प्रकरण पुन्हा उघडलं; PWD कनेक्शन नेमकं काय?

सिल्लोड-जळगाव महामार्गावर भीषण अपघात; पालोद येथे भरधाव ट्रकच्या धडकेत १५ वर्षीय बालकाचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : धुळ्यात महसूलमंत्री बावनकुळेंनी अधिकाऱ्याची शेतातच घेतली ‘शाळा’

Noida Crime : सातव्या महिन्यातच मुलाचा जन्म, उपचारासाठी खर्च झाले ४० लाख; इंजिनिअरने कर्ज, तवाणावातून ४३ व्या मजल्यावरुन उडी मारुन जीवन संपवले

Pitru Paksha 2026: सर्वपित्री अमावस्येला नवरात्रीच्या पूजेचे सामान खरेदी करावे की नाही? जाणून घ्या नियम...

SCROLL FOR NEXT