मुंबई

नागरिकांच्या तक्रारींची दखल घ्या

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : गोरेगाव पश्चिमेतील बेकायदा गाळ्यांबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानुसार खंडपीठाने बेकायदा गाळे जमीनदोस्त करण्याचे निर्देश दिले आहेत. इतकेच नव्हे तर नागरिकांच्या तक्रारीची दखल घेणे हे पालिकेचे कर्तव्य असून पालिकेने अशा बेकायदेशीर बांधकामांना चालना देणे चुकीचे असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले आहे.
गोरेगाव, पहाडी व्हिलेज येथे राम निवास व दुबे भवन या दोन इमारती होत्या. त्या इमारती धोकादायक झाल्याने रहिवाशांना पालिकेने नोटीस बजावत ती रिकामी करण्यास सांगितले. २०१८ साली या दोन्ही इमारती पाडण्यात आल्या. त्यानंतर जमीनमालकाने त्या जागेवर तात्पुरते शेड बांधून ती जागा दुकानदारांना दिली. या प्रकरणी इमारतीतील मूळ रहिवाशांनी पालिकेकडे दाद मागितली. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नसल्याने रहिवाशांनी अॅड. मोना व्यास यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्या. महेश सोनक आणि न्या. कमल खाता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने बेकायदेशीर बांधकाम तातडीने जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले. त्यावर हे बांधकाम तीन आठवड्यांत हटवण्यात येईल, अशी हमी देण्यात आली आहे. त्यानुसार या प्रकरणाची सुनावणी १८ जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
-----------------------------------
...तर पालिकेने कारवाई करावी
तीन आठवड्यांत जमीनमालकाने बांधकाम हटवले नाही तर पालिकेने त्यावर कारवाई करावी, असे आदेश न्या. महेश सोनक यांच्या खंडपीठाने दिले आहेत. सुनावणीवेळी पालिकेच्या वतीने बाजू मांडणाऱ्या अॅड. स्मिता तोंडवळकर यांनीदेखील तशी हमी न्यायालयाला दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप नेत्याच्या वडिलांची निर्घृण हत्या, तोंडात कागद कोंबले अन् डोळे फोडले

Latest Marathi News Live Update: कल्याणमध्ये वीजमीटर फॉल्टच्या नावाखाली महिलेची ३ लाखांची फसवणूक

Bhushan Gavai : माजी सरन्यायाधीश भूषण गवई बागेश्वर धाममध्ये; धीरेंद्र शास्त्रींच्या भेटीचा फोटो व्हायरल, आध्यात्मिक विषयांवर अर्धा तास खलबतं!

हसायचं तर हसा पण ट्रेंड म्हणून अक्षोभ्य नाव नाही ठेवलेलं... अधोक्षज कऱ्हाडेने सांगितलं हे नाव ठेवण्याचं खरं कारण

IPL 2026: सोबत कॅमेरामन कशाला? धोनी दीपक चाहरवर वैतागला, पुढे काय घडलं? MI ने शेअर केला Viral Video

SCROLL FOR NEXT