मुंबई

अपघातानंतर वडिलांना फोन अन नॉट रिचेबल

CD

... तर कावेरी वाचली असती
नाखवा कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर
मुंबई, ता. ७ : वरळी कोळीवाड्यात राहणाऱ्या कावेरी नाखवा कुटुंबीयांसाठी आधार होत्या. मासेमारी बंद असल्याने क्रॉफर्ड मार्केटमधून मासे घेऊन विभागात विकायला येत असताना हा अपघात झाला. त्यांच्या मुलाला नवीन नोकरी लागल्यामुळे नाखवा दाम्पत्याने बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखला होता, पण त्यापूर्वीच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.
वरळी हीट ॲण्ड रन प्रकरणात प्रदीप नाखवा यांनी घडलेला प्रकार कथित केला. दोघेही दुचाकीने परतत असताना पाठीमागून जोराची धडक बसल्याने मी खाली कोसळलो. माझी पत्नीही माझ्या पाठीवर कोसळल्यामुळे तिला जास्त लागले नव्हते, मात्र गाडीचा वेग वाढवल्याने पत्नीला फरपटत नेले. मी गाडी थांबविण्यासाठी मागे विनंती करत होतो, मात्र त्याने ऐकले नाही. वेळीच ब्रेक दाबला असता तर माझी पत्नी वाचली असती, असे प्रदीप नाखवा यांनी सांगितले. माझ्या डोळ्यादेखत पत्नीला फरपटत नेले. या घटनेने आमचे संपूर्ण कुटुंब कोलमडले. माझा मुलगा यश आईचा खूप लाडका होता. तो सकाळी कामावरून घरी आला तेव्हा त्याला आईच्या मृत्यूबाबत सांगण्याचे धाडस झाले नाही. याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी प्रदीप यांनी केली आहे.
----------------------------------------------
अपघातानंतर वडिलांना फोन
पोलिसांनी प्रेयसीचाही जबाब नोंदवला
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : वरळी हिट ॲण्ड रन प्रकरणात पोलिसांकडून वाहनाच्या तपासणीसाठी आरटीओ आणि फॉरेन्सिक टीम बोलवण्यात आली आहे. या प्रकरणात त्याच्या प्रेयसीचाही जबाब नोंदवला गेला आहे, तसेच अपघातानंतर कार वांद्रे कलानगर परिसरात सोडल्यानंतर मिहीर शहाने वडील राजेश शहा यांना कॉल करून घडलेला घटनाक्रम सांगून मोबाईल बंद केल्याची माहिती समोर येत आहे.
मिहीर शहा याने शनिवारी रात्री जुहू येथील एका बारमध्ये मद्यप्राशन केले होते. तो मित्रांसोबत या बारमध्ये पार्टीसाठी आला होता. त्यांचे बिल १८ हजार ७३० रुपये झाले होते. ते मिहीरच्या मित्राने भरले होते. रात्री दीडच्या सुमारास ते बारमधून बाहेर पडले. त्यानंतर मिहीर गोरेगावला घरी गेल्यानंतर त्याने कारचालकाला लाँग ड्राईव्हला जायचे असल्याचे सांगितले. कार घेऊन तो मुंबईत आला आणि मुंबईतून पुन्हा गोरेगावच्या दिशेने निघाला. गोरेगावला जाताना मिहीर शहा हा स्वतः गाडी चालवत असताना वरळीत हा अपघात झाला. अपघातानंतर घाबरलेल्या मिहीरने घटनास्थळावरून पळ काढला. वांद्रे कलानगर परिसरात कारचालकाला सोडून त्याने वडिलांना कॉल करून घडलेला घटनाक्रम सांगितला. त्यानंतर मोबाईल बंद करत त्याने गोरेगावला राहणाऱ्या प्रेयसीचे घर गाठले. गोरेगावहून सकाळी आठ वाजता मिहीर मित्राकडे जातो, असे सांगून निघाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT