मुंबई

लाडकी बहीण योजनेसाठी मुंबई बँकेची योजना

CD

लाडकी बहीण योजनेसाठी मुंबई बँकेची योजना
मुंबई, ता. ८ : मुख्यमंत्र्यांच्या माझी लाडकी बहीण योजनेकरिता मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झिरो बॅलन्स खाते उघडण्याची संधी महिलांना मिळणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
या योजनेत मिळणारे पैसे जमा करण्यासाठी मुंबई जिल्हा बँकेत झिरो बॅलन्स अकाऊंट उघडता येणार आहे. त्यासाठी पैसे भरण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या महिलांनी मुंबई जिल्हा बँकेच्या जवळच्या शाखेत आपले खाते उघडावे, असे आवाहनही दरेकर यांनी केले. राष्ट्रीयीकृत किंवा खासगी बँकांमध्ये खाते उघडल्यावर हल्ली त्यात किमान रक्कम म्हणून पाच ते पंधरा हजार रुपये ठेवणे आवश्यक असते. किमान रक्कम शिल्लक न ठेवल्यास दंड आकारला जातो. त्यामुळे असे खाते उघडणे सर्वसामान्य महिलांना परवडण्यासाठी मुंबई बँकेत झिरो बॅलन्स खाते उघडण्याची व्यवस्था करावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दरेकर यांना केली होती. त्यानुसार हा निर्णय घेतला असल्याची माहिती दरेकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Municipal Property: पुणे महापालिकेच्या ताब्यातील चार हजार मिळकती बेवारस; प्रॉपर्टी कार्डवर नोंदच नाही, मालमत्ता विभागाचे दुर्लक्ष!

IPL 2026 PKBS vs GT : गुजरातविरुद्ध सामन्यात पंजाब किंग्जला विजय मिळून देणारा कूपर कोनोली नेमका कोण? रिंकी पाँटिंगशी आहे खास कनेक्शन...

Mumbai News: प्रामाणिक कामगिरीतूनच यश; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ‘यिन’ अधिवेशनात युवकांना मार्गदर्शन

Gold Rate Today: सोनं सलग 6 व्या दिवशी महाग! 1.5 लाखांचा टप्पा पुन्हा ओलांडला; मुंबईत आजचा ताजा भाव किती?

April Fools Day 2026: एप्रिलच्या पहिल्या दिवशीच का साजरी केला जातो 'एप्रिल फूल्स डे'? जाणून घ्या महत्त्व अन् इतिहास

SCROLL FOR NEXT