मुंबई

मुसळधार पावसामुळे साकीनाका जलमय

CD

मुसळधार पावसामुळे साकीनाका जलमय
वाहनांचे, घरातील साहित्‍याचे नुकसान
घाटकोपर, ता. ८ (बातमीदार) ः रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे साकीनाका जंक्शनजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने संपूर्ण परिसर जलमय झाला होता. पावसाचा जोर वाढल्याने आजूबाजूच्या परिसरात पाणी शिरले. त्यामुळे झोपेत असणाऱ्या लोकांमध्ये घबराट पसरली.
परिसरातील चाळीमध्ये आणि घरात पाणी शिरल्याने रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. येथून वाहणारे नाले तुडुंब भरल्याने सुमारे सहा ते सात फुटांपर्यंत पाण्याची पातळी वाढली होती. घरांतील साहित्‍य, दुकानदारांच्या मालाचे अतोनात नुकसान झाले. पाण्याचा जोर इतका होता की, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सुमारे पंचवीस ते तीस चारचाकी, दहा-पंधरा दुचाकी वाहने एकमेकांवर आदळून त्‍यांचे नुकसान झाले.
हा भाग सखल असून येथील नाले कचऱ्याने भरलेले असतात. जेसीबीच्या साह्याने ते अनेक वेळा साफ केले जातात; परंतु कायमस्वरूपी उपाययोजना केल्‍या जात नाहीत, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.

२६ जुलैच्या पुरानंतर आता दुकानात पाणी शिरले. या भागात आमची दोन दुकाने आहेत. सामान पाण्यामध्ये भिजल्यामुळे सुमारे पंधरा ते वीस लाख रुपयांचे नुकसान झाले.
- सुरज चौधरी,
इलेक्ट्रिक्स, हार्डवेअर सामानाचे विक्रेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कागदपत्रे द्या किंवा जागा खाली करा...; एसआरएने धारावी पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना अंतिम नोटीस बजावली, किती दिवसांची?

MHADA: म्हाडाचे घर घेण्याची संधी! लॉटरीमध्ये ८,००० घरांचा समावेश, पण कुठे? जाणून घ्या ठिकाण आणि प्रकिया...

Indore EV Fire Accident: इंदौरसारखी दुर्घटना टाळायचीये? मग इलेक्ट्रिक कार चार्ज करताना अजिबात करू नका 'या' 5 चुका

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गारांचा पाऊस

Stray Dogs Attack : मोकाट कुत्र्यांचा कहर; सात वर्षांच्या चिमुरडीवर हल्ला!

SCROLL FOR NEXT