मुंबई

मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतुकीचे तीनतेरा

CD

मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतुकीचे तीनतेरा
सबवे खाली अडकलेल्या जोडप्याची सुटका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : रात्रभर कोसळणाऱ्या पावसाने सोमवारीही (ता. ८) मुंबईला झोडपून काढले. सखल भागात पाणी साचल्याने शहरात अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली; तर ठिकठिकाणी वाहने बंद पडल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला होता.
मुंबईतील किंग सर्कल, दादर टीटी, अंधेरी सब-वे, कांदिवली, वाकोला, कुर्ला आदी परिसरात वाहने बंद पडल्यामुळे वाहतूक मंदावली. याशिवाय हिंदमाता, अंधेरी सब-वे, वडाळा, शिवडी येथे पाणी साचले होते. पाऊस कमी झाल्यावर काही ठिकाणी पाण्याचा निचरा झाला, तर काही ठिकाणी पाण्याचा निचरा होत आहे.
रविवारी मध्यरात्री एक वाजल्‍यापासून सकाळी सात वाजेपर्यंत मुंबईत जोरदार पाऊस झाला. सक्कर चौक येथे पाणी साचल्यामुळे वडाळा व शिवडी येथे जाणारी वाहतूक मंदगतीने सुरू होती. याशिवाय अंधेरी सबवे येथेही पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. याशिवाय कुर्ला एलबीएस रोडला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे तेथील वाहतूकही संथगतीने सुरू होती.
मोठ्या प्रमाणात वाहने बंद पडल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. अंधेरी आकृती मॉल येथे बेस्ट बस बंद पडल्यामुळे तेथील वाहतूक मंदावली होती. विमानतळावरील एलिव्हेटेल मार्गावर कार बंद पडून तेथील वाहतूकही प्रभावित झाली होती, वाहनांच्या बिघाडामुळे किंग सर्कल, माटुंगा उत्तरेकडे व दक्षिणेकडे जाणारी वाहतूक संथगतीने सुरू होती. कुर्ला हॅलो डेपो, दादर टीटी, वाकोला येथील राम नगर सबवे येथेही वाहने बंद पडली होती, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.
--

वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांचे असेही काम
ऊन असो किंवा पाऊस, वाहतूक पोलिस आपले कर्तव्य बजावत असतात. पण काही वेळा तर कर्तव्यापलीकडचे कामही केल्याचे पाहायला मिळते. मुंबईत सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी रामनगर सबवेजवळील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ड्रेनेजचे खड्डे साफ करण्यात वाकोला वाहतूक अधिकारी योगदान देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirgudsar Theft : बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि १५ हजार रुपये रोख रक्कम नेली चोरून

TMC rebels join BJP: 'तृणमूल'चे १७ बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर? NCPI नेत्याचं धक्कादायक विधान

Marathi News Live Updates : पुण्यात पाच मानाच्या गणपतीसह प्रमुख गणपती मंडळांची प्राणप्रतिष्ठा

रेल्वेत कुटुंबियांसोबत बसण्यासाठी सीट बदलता येते का? जाणून घ्या रेल्वेचा नियम...

LONG LIFE HOROSCOPE: या’ 6 राशींच्या लोकांना मिळतं दीर्घायुष्याचं वरदान? 100 वर्षांनंतरही राहतात निरोगी, ज्योतिषशास्त्रात काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT