मुंबई

खड्ड्यामुळे चिमुरड्याचा बळी

CD

तारापूर, ता. ८ (बातमीदार)ः बोईसरच्या मधुर चौकात पाणी भरलेल्या खड्ड्यात दुचाकी आदळून झालेल्या अपघातात चिमुरड्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नागरिकांनी दोन तास ‘रास्ता रोको’ करत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
बोईसरच्या मधुर हॉटेल चौकाची पहिल्याच पावसात चाळण झाली आहे. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास मधुर चौकातील खड्ड्यात दुचाकी आदळून झालेल्या अपघातात पालकांसोबत दुचाकीवरील दीड वर्षीय माहीर सिवानीचा रस्त्यावर पडल्याने जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर त्याला बोईसर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या अपघातानंतर नागरिकांनी मधुर चौक येथे जवळपास एक तास ‘रास्ता रोको’ आंदोलन करून वाहतूक रोखून धरली. तसेच रस्त्याची जबाबदारी असलेल्या एमआयडीसीच्या संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी बोईसर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिरीष पवार यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. याप्रकरणी बोईसर पोलिस ठाण्यात नोंद करून पुढील तपास सुरू आहे.
-------------------------------
आठवड्याभरातील दुसरी घटना
बोईसर परिसरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे निष्पाप लोकांचा जीव जात आहे. तारापूर एमआयडीसी, बोईसर चिल्हार रस्त्यावर पडलेले खड्डे पावसाच्या आधी बुजवण्यासाठी तारापूर एमआयडीसी विभागाकडे सातत्याने मागणी करण्यात आली होती. मात्र, पावसाळापूर्व रस्त्यांची दुरुस्ती आणि खड्डे भरण्याकडे दुर्लक्ष झाल्याने आठवड्याभरापूर्वी बोईसर-चिल्हार रस्त्यावरील अपघातात एका शालेय विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: रुपाली चाकणकरांना राजीनामा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश; आजच निर्णय? सूत्रांची माहिती

Thane News: ठाणेकरांसाठी मोठी बातमी! २३ मार्चपासून २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार; पण कधीपर्यंत आणि कुठे? जाणून घ्या यादी...

US-Iran War : अमेरिका इराणमध्ये पाठवणार २५०० सैनिक, होर्मूज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी नवा प्लॅन

Diesel Price: मोठा झटका! पेट्रोलनंतर डिझेलही महागलं; तब्बल २२ रुपयांनी वाढ, जाणून घ्या नवे दर...

Unseasonal Rain Hits KedarKheda Region : केदारखेडा परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा; गहू-हरभरा-ज्वारी पिकांचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT