मुंबई

बेलापूर रेल्वे स्थानकात लोकलखाली आलेल्या महिलेचे दोन्ही पाय झाले निकामी

CD

लोकलखाली आल्याने महिलेचे पाय निकामी
बेलापूर स्थानकातील घटना

नवी मुंबई, ता. ८ (वार्ताहर) : चक्कर येऊन रेल्वे रुळांवर पडलेली विवाहित महिला लोकलखाली आल्याने तिचे दोन्ही पाय कापले गेल्याची घटना सोमवारी (ता. ८) सकाळी सीबीडी बेलापूर रेल्वेस्थानकात घडली. रोहिणी राजेश बोटे (वय २०) असे या विवाहितेचे नाव असून तिच्यावर बेलापूर येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेतील जखमी विवाहिता तळोजा येथे राहण्यास असून ती सोमवारी सकाळी आपल्या कामावर जात होती. त्यासाठी ती सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सीबीडी-बेलापूर रेल्वेस्थानकात आली होती. या वेळी पनवेल येथून ठाण्याला जाणारी १०.३ वाजताची लोकल फलाटावर येत असताना रोहिणीला अचानक चक्कर आल्याने ती रेल्वे रुळांवर पडली आणि लोकलच्या खाली सापडून गंभीर जखमी झाली. लोकलच्या चाकाखाली आल्याने तिचे दोन्ही पाय कापले गेले. तिला बाहेर काढून एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेला अचानक चक्कर येऊन ती रेल्वे रुळांवर पडल्याने ही दुर्घटना घडल्याचे पनवेल रेल्वे पोलिसांनी सांगितले. या दुर्घटनेमुळे ठाणे लोकल १५ मिनिटे अडकून पडल्याने पनवेल येथून मुंबई-ठाण्याच्या दिशेने जाणारी लोकल सेवा विस्कळित झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel Tension: हॉर्मुज संकटाचा फटका! गाडी खरेदी आता आणखी महाग होणार; ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार

Pune News : ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश रांका यांचे निधन; पुणे व्यापारी क्षेत्रात शोककळा

Pune Viral Video: भर पावसात फूड डिलिव्हरी बॉय पडला पाण्यात; पुण्यातला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

KKR vs SRH Live : पुन्हा २०० पार... ट्रॅव्हिस, अभिषेक, हेनरिच, नितीश यांची तुफान फटकेबाजी; कोलकातासमोर तगडे लक्ष्य

Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त गोण्यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

SCROLL FOR NEXT