मुंबई

जिल्ह्यात पावसाने जनजीवन विस्कळीत

CD

ठाणे, ता. ८ : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात कोसळणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळित झाले आहे. रविवारी सकाळी ८.३० ते सोमवारी सकाळी ८.३० या कालावधीत जिल्ह्यात ११० मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून भिंत कोसळण्याच्या काही घटनांची नोंद आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागांसह ठाणे शहरातदेखील पावसाने दमदार हजेरी लावली आहे. रविवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याचे दिसून आले. सोमवारी सकाळी हा जोर अधिक वाढल्याचे दिसून आले. यावेळी शहरात जवळपास १२७.९८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पावसामुळे शहरातील विविध भागांत पडझड झाल्याच्या घटना घडल्या. यामध्ये तीनहात नाका परिसरात असलेल्या वन विभागाची संरक्षक भिंत जमीन खचली, तर लोकमान्य पाडा क्रमांक ४ मध्ये डोंगरावरील माती खचली असून लोकमान्य नगर भागात टीएमटी बसडेपोची संरक्षक भिंत पडली. रात्रीपासून पडणाऱ्या पावसाने शहरातील टेंभी नाका, आंबेडकर रोड आदींसह वंदना परिसरातील सखल भागांत पाणी साचल्याचे दिसून आले. तसेच झाड पडण्याच्या ५, फांद्या पडल्याच्या २, धोकादायक स्थितीत वृक्ष २, प्लास्टर कोसळल्याच्या एका घटनेची आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे नोंद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलून आरोपी तरुण बेपत्ता; एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

Jorhat Airbase Incident Video : हवाई दलाच्या विमानाला लँडिंगदरम्यान भीषण आग, ५ जवान शहीद; दुर्घटनेचा लाईव्ह व्हिडिओ आला समोर

Sangli Crime: वेदांत बंडगर खून प्रकरणातील मुख्य सुत्रधार निलेश गडदे कर्नाटक सीमेजवळ अटक; एलसीबीची धडक कारवाई

Pune Nashik High Speed: पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मूळ आराखड्यानुसारच; जीएमआरटी अडथळा नसल्याचा तज्ज्ञांचा निष्कर्ष

SCROLL FOR NEXT