मुंबई

विमान वाहतुकीला फटका

CD

विमान वाहतुकीला फटका
५० हून अधिक उड्डाणे रद्द; २७ विमानांची वाहतूक वळवली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाने विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. पावसामुळे सोमवरी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वाहतूक विस्कळित झाली. यामुळे २७ उड्डाणे वळवण्यात आली आणि ५० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानता यामुळे रविवारी (ता. ७) मध्यरात्री २.२२ ते पहाटे ३.४० पर्यंत धावपट्टीचे कामकाज स्थगित करावे लागले. वाहतूक पुन्हा सुरू झाल्यानंतर विमानतळ प्रशासनाने येणाऱ्या विमानांना प्राधान्य दिले. ‘सीएसएमआयए’च्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘‘पावसामुळे विमान वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. त्यामुळे काही उड्डाणे वळविण्यात आली आहेत. हवामानाच्या घटनेमुळे होणारे अतिरिक्त वेळापत्रक बदलण्यासाठी काम सुरू आहे. प्रवाशांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या नियोजित सुटण्याच्या वेळेच्या अगोदर त्यांच्या विमान कंपन्यांशी थेट त्यांच्या फ्लाइटची स्थिती तपासावी.’’ यामध्ये इंडिगो कंपनीची उड्डाणे सर्वात जास्त प्रभावित झाली. यामध्ये येणारी २२ आणि जाणारी २० विमाने रद्द करण्यात आली, तर स्पाइस जेटची येणारी आणि जाणारी प्रत्येकी तीन उड्डाणे रद्द करण्यात झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT