मुंबई

दहा हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

CD

पालघर (बातमीदार) : विक्रमगड तालुक्यातील औंदे येथील श्री स्वामी समर्थ परिवाराच्या श्री स्वामी समर्थ मठातर्फे विक्रमगड आणि जव्हार तालुक्यातील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या १० हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गणवेश, स्कूल बॅग व अन्य साहित्याचे वाटप करण्यात आले. पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक साहित्य वाटपाचा अभिनव कार्यक्रम रविवारी (ता. ७) पार पडला. श्री स्वामी समर्थ परिवाराच्या लक्ष्मीकांत दांडेकर आणि अर्चना दांडेकर यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाला खासदार डॉ. हेमंत सवरा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संतोष पावडे, विक्रमगड पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रवींद्र पारखे, सागर आळशी आदी मान्यवर उपस्थित होते. शिक्षणापासून एकही मुलगा वंचित राहू नये, विशेष करून आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात राहता यावे, हा उद्देश ठेवून लक्ष्मीकांत दांडेकर यांनी २१ वर्षांपासून विक्रमगड तालुक्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य विद्यार्थ्यांना नित्यनेमाने देत आहेत. याच बरोबरीने या संस्थेमार्फत नागरिकांसाठी व्यसनमुक्ती, तरुण मुलींसाठी वैद्यकीय शिबिर, सॅनिटरी पॅडचे वितरण व इतर उपक्रम राबविले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT