मुंबई

पुरामुळे ९१ जणांचे स्थलांतर

CD

खर्डी, ता. ८ ः शहापूर तालुक्यात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पुराचे पाणी घरात घुसून २२३ घरांतील जीवनावश्यक वस्तू व मालमत्तेचे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे करण्यात आले असून ९१ बाधित रहिवाशांना आपत्ती व्यवस्थापन समितीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले आहे.
शहापूर नगरपंचायत हद्दीतील गुजराती बाग येथील (७५), गुजराती नगर (३५), वासिंद सृष्टी फार्म परिसर (८१) व आवळे (३२) येथील घरात पुराचे पाणी घुसून जीवनावश्यक वस्तू व मालमत्तांचे नुकसान झाले आहे; तर गुजराती बाग येथेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने या परिसरातील बाधित रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
दरम्यान, भारंगी नदी पात्रातील अतिक्रमणामुळे हा पूर आला असल्याने नदी पात्रातील अतिक्रमण तोडण्याच्या मागणीसाठी रहिवाशांनी ‘रास्ता रोको’ केला होता. त्याची दखल घेत प्रशासनाने अतिक्रमणे हटवण्याचे काम सुरू केल्याने रहिवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya : मुंबई इंडियन्सकडून १६.३५ कोटी पगार; हार्दिकने गर्लफ्रेंडसाठी खरेदी केली कोट्यवधींची कार... भारतातील पहिलाच मॉडल

आई, बहीण अन् भाच्याचा गळा चिरला, स्वत:लाही संपवण्याचा प्रयत्न; चिटफंडच्या कर्जाचा डोंगर अन् बहिणीच्या आजारपणामुळे टोकाचा निर्णय

Manchar Tax Dues: मंचर नगरपंचायतीची ४.८४ कोटींची कर थकबाकी; घरपट्टी–पाणीपट्टी न भरल्यास जप्ती व लिलावाची कारवाई

Latest Marathi News Live Update : शिंपेगावमध्ये मूकबधिर तरुणावर लाकडी दांड्याने मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

MPSC Agriculture Officers: अवसरी बुद्रुकच्या शेतकरी कुटुंबातील तेजश्री व अक्षय हिंगे दांपत्याची कृषी विभागात अधिकाऱ्यपदी चमकदार कामगिरी

SCROLL FOR NEXT