मुंबई

लाच घेताना दोघांना अटक

CD

कल्याण, ता. ९ (वार्ताहर) : औषध विक्रीच्या दुकानाचा परवाना मंजूर करण्यासाठी ७० हजारांची लाच घेताना ठाणे अन्न आणि औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षकासह अन्य एकाला नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. कल्याण पश्चिमेतील डी-मार्टसमोर ही कारवाई करण्यात आली.
ठाणे अन्न आणि औषध विभागातील निरीक्षकपदावर काम करणारे संदीप नरवणे यांनी नवीन औषध विक्री दुकानाचा परवाना मंजूर करण्यासाठी शासकीय शुल्काव्यतिरिक्त स्वतःसाठी एक लाखांची मागणी संबंधित व्यावसायिकाकडे केली होती. मात्र, ७० हजारांत तडजोड करण्यात आली होती. याप्रकरणी नवी मुंबई लाचलुचपत विभागाकडे दाखल तक्रारीवरून कल्याण पश्चिमेत संदीप नरवणे याच्या उपस्थितीत तक्रारदाराकडून पैसे स्वीकारताना सुनील चौधरी याला पकडण्यात आले. त्यानंतर कल्याणमधील महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात दोघांवरही भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ च्या कलम ७,७ (अ), १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुखापतींनी त्रासलेल्या CSK ला दिलासा मिळणार! MS Dhoni मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार... 'त्या' Video ने दिले संकेत

Jalgaon Weather : तापमानात घट; दोन दिवस पावसाची शक्‍यता! रात्री तुरळक पाऊस; दिवसा ऊन-सावल्‍यांचा खेळ

Latest Marathi News Live Update: खर्डी–उंबरमळी स्टेशनमध्ये कोरड्या गवताला आग

Uday Samant : आयटी पार्कसाठीची जागा हस्तांतरित करणार; उद्योजकांची सातारा, कोल्हापूरमध्ये कार्यशाळा घेणार

Food Safety : ‘चीज’ नावाखाली ‘चीज ॲनालॉग’ची विक्री; मेनू, बिल व लेबलवर स्पष्ट उल्लेख करण्याचे एफडीएचे निर्देश

SCROLL FOR NEXT