मुंबई

म्हाडाच्या ई-लिलावातील अर्जदारांना आजपासून गाळ्याचे देकरपत्र मिळणार

CD

म्हाडाच्या ई-लिलावातील अर्जदारांना
आजपासून गाळ्याचे देकारपत्र मिळणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील विविध वसाहतींमधील १७३ व्यावसायिक गाळ्यांच्या विक्रीसाठी राबविलेल्या ई-लिलावातील यशस्वी ठरलेल्या ११२ अर्जदारांना बुधवारपासून (ता. १०) तात्पुरते देकारपत्र देण्यात येणार आहे. तसेच ई-लिलावात लावलेल्या बोलीच्या दहा टक्के रक्कम भरल्यानंतर उर्वरित रकमेसाठी कर्ज घेण्यासाठी अर्जदारांना ना-हरकत प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
म्हाडाने व्यावसायिक गळ्यांच्या विक्रीसाठी नुकताच ई-लिलाव काढला होता. त्यामध्ये १७३ गाळ्यांपैकी ११२ अर्जदारांनी यशस्वी बोली लावली होती. त्यांना बुधवारपासून तात्पुरते देकारपत्र दिले जाणार आहे. दरम्यान, या ई-लिलावातील यशस्वी अर्जदारांच्या स्वीकृतीसाठी दहा दिवसांचा अवधी देण्यात आला. मुंबई मंडळातर्फे १७३ अनिवासी गाळयांच्या ई-लिलावाद्वारे विक्रीसाठी मार्चमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली व निकाल २८ जून रोजी जाहीर झाला. त्याअनुषंगाने ११२ गाळ्यांसाठी ६०४ अर्जदारांनी विहित अनामत रकमेचा भरणा करीत लिलावात बोली लावली. ६१ अनिवासी गाळ्यांना अर्जदारांचा शून्य प्रतिसाद मिळाला. मंडळातर्फे १७३ अनिवासी गाळ्यांसाठी ९७.७४ कोटी रुपये बोली निश्चित करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT