मुंबई

बांधकामासाठीच्या खड्ड्यात तरुणाचा मृत्यू

CD

नवी मुंबई, ता. ९ (वार्ताहर) ः जुईनगर सेक्टर-२३ मध्ये राहणाऱ्या राज सनगरे (२८) या तरुणाचा इमारतीच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाला आहे. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली असून वाढदिवशीच हा प्रकार घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
जुईनगरमधील मंगलप्रभू हॉस्पिटलजवळ इमारतीच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात राज सनगरे मित्रांसमवेत पोहण्यासाठी गेला होता. मंगळवारी त्याचा वाढदिवस असल्याने पार्टी केल्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास राज पोहण्यासाठी पाण्यात उतरला; पण पोहता येत नसल्याने तो बुडाला. राजच्या मित्रांनी याबाबतची माहिती त्याच्या कुटुंबीयांना दिल्यानंतर नेरूळ पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर राजचा मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी नेरूळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT