मुंबई

आता दुय्यम अभियंत घेणार खड्ड्यांचा शोध

CD

दुय्यम अभियंते घेणार खड्ड्यांचा शोध
२४ तासांत खड्डे बुजवा; अभिजित बांगर यांचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : मुंबईत पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे रस्त्यात खड्डे पडण्याची शक्यता आहे. मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी दुय्यम अभियंत्यांनी खड्ड्यांचा शोध घ्यावा आणि २४ तासांत खड्डे बुजवा, असे निर्देश पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी संबंधितांना दिले आहेत.
मुंबईत अतिवृष्टी झाल्‍यास रस्त्यांवर खड्डे पडण्याची शक्यता आहे. मुंबईकरांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागू नये, यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. त्यानुसार रस्ते वाहतूक योग्य सुरक्षित स्थितीत आणण्यासाठी, तसेच खड्डेमुक्त रस्त्यांसाठी तातडीने उपाययोजना आखण्याबाबत मंगळवारी (ता. ९) अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांच्या अध्यक्षतेखाली पालिका मुख्यालयात बैठक पार पडली. त्यावेळी बांगर यांनी हे निर्देश दिले. प्रमुख अभियंता (रस्ते) गिरीश निकम यांच्यासह अभियंते, अधिकारी उपस्थित होते.

रस्‍त्‍यांवर उतरा !
अतिवृष्टीमुळे रस्ते खरवडण्याची, रस्त्यांना खड्डे पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे २२७ दुय्यम अभियंत्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात रस्त्यांवर उतरावे. स्वत:हून खड्डे भरण्याची कार्यवाही पूर्ण केली पाहिजे. रस्ते दुरुस्ती कामामध्ये अभियंत्यांकडून तत्परता दिसली पाहिजे. खड्डा निदर्शनास आल्यास २४ तासांत खड्डा बुजवा, असे निर्देश बांगर यांनी रस्ते विभागातील अभियंत्यांना दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: मद्यपाशातून मुक्तीसाठी ५० रुग्णालयांत जनजागृती स्टॉल

टॉप थ्री वगळून ४ ते ६ नंबरच्या न्यायाधीशांची शिफारस; सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

आयआयटीत मृत्यूचे सावट! २० वर्षांत १७१ विद्यार्थ्यांची आत्महत्या, धक्कादायक वास्तव समोर

SCROLL FOR NEXT