मुंबई

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

CD

पालघर, ता. १० (बातमीदार) : मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत ‘मागेल त्याला शेततळे’ कृषी विभागामार्फत २०२४ -२५ आर्थिक वर्षाकरिता पालघर जिल्ह्याला १३० भौतिक लक्षांक प्राप्त झालेला आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेचा लाभ ध्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर यांनी केले आहे. लाभार्थी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर किमान ०.२० हेक्टर क्षेत्र असावे, शेतकऱ्याची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य असावी, अर्जदाराने यापूर्वी कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे या घटकाअंतर्गत सरकारच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा, या प्रमुख अटी आहेत. या योजनेंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळ्यांकरिता कमाल रक्कम ७५ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते. या योजनेचा लाभ घेण्याकरिता इच्छुक शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असेच संबंधित योजनेबाबत अधिक माहितीसाठी प्रत्येक तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन भागेश्वर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime : मुंबई हादरली ! पतीने पत्नीला धावत्या लोकल ट्रेनखाली ढकलले, धक्कादायक कारण समोर

राज्यसभा निवडणुकीत विरोधकांची गेम, भाजपने पुरेसं संख्याबळ नसतानाही २ जागा जिंकल्या; काँग्रेसला आमदारांचा दगा, काय घडलं?

Pune Mumbai Expressway: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ चे काम पूर्ण; 'या' दिवशी होणार खुला, प्रवासाचा वेळ २५ मिनिटांनी वाचणार!

Latest Marathi News Live Update : पेट्रोलपंपांवर आता रॉकेलही मिळणार, राज्य सरकारची माहिती

Sambhajinagar Amrut Peth 2026: ‘अमृत पेठ २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; स्थानिक उत्पादनांना नागरिकांची पसंती; नवउद्योजकांना मोठी संधी

SCROLL FOR NEXT