मुंबई

कर्करोग रुग्णालयाला मुहूर्ताची प्रतीक्षा

CD

भाईंदर, ता. १० (बातमीदार) : मिरा-भाईंदरसह आसपासच्या परिसरातील पहिल्या प्रस्तावित कर्करोग रुग्णालयाला अद्याप मुहूर्तच मिळालेला नाही. रुग्णालयासाठी राज्य सरकारने १३४ कोटी रुपये मंजूर केले आहेत, मात्र रुग्णालयासाठी आवश्यक असलेली परवानगी, त्याचे अंदाजपत्रकच अद्याप तयार झाले नसल्याने रुग्णालयाच्या बांधकामाचे कार्यादेश देण्यात आलेले नाहीत.

मिरा रोड येथील प्रसूतिगृह व वाचनालय याचे आरक्षण असलेल्या भूखंडावर महापालिकेने रुग्णालय बांधण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार गीता जैन यांनी या जागेवर कर्करोग रुग्णालय बांधण्यात यावे, अशी संकल्पना मांडली व त्यासाठी राज्य सरकारकडून १३४ कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे. कर्करोगावरील उपचारासाठी आवश्यक असलेली रेडिएशन, तसेच केमोथेरपी उपचार पद्धत या रुग्णालयात उपलब्ध करून दिली जाणार आहे. मिरा ओड ते पालघर परिसरातील हे पहिले रुग्णालय असणार आहे. त्यामुळे कर्करोगाच्या रुग्णांना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. गेल्यावर्षी एप्रिलमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे भूमिपूजन करण्यात आले, परंतु प्रत्यक्ष बांधकामाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.

सुरुवातीला कर्करोग रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या सुविधा रुग्णालयाच्या आराखड्यात समाविष्ट नसल्यामुळे प्रशासनाला निविदा प्रक्रिया पुन्हा राबवावी लागली. कर्करोग रुग्णालयासाठी रेडिएशन टाकीची आवश्यकता असते. त्याची रचनाही वेगळ्या स्वरुपाची असते. शिवाय त्यासाठी भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राचा ना हरकत दाखला घेणे आवश्यक आहे. हा दाखला महापालिकेला मिळालेला नाही. हे रुग्णालय नागपूर येथील कर्करोग रुग्णालयाच्या धर्तीवर आता उभारले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने हितेन सेठी ॲण्ड असोसिएट्स या सल्लागाराची नेमणूक केली आहे, परंतु या सलागाराकडून रुग्णालयाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आलेले नाही.

दुसरीकडे नवीन सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने त्याच्या आराखड्यात बदल केले जात असून आराखडाही अद्याप अंतिम झालेला नाही. त्याचबरोबर रुग्णालयाच्या भूखंडाचा काही भाग महापालिकेच्या ताब्यात येणे बाकी आहे. त्यामुळे रुग्णालय बांधणाऱ्या कंत्राटदाराला कार्यादेश देण्यात आलेले नाहीत. बांधकाम कार्यादेश देण्यात आले नसल्याने राज्य सरकारने मंजूर केलेल्या १३४ कोटी रुपये निधीपैकी एकही रुपया महापालिकेच्या तिजोरीत जमा झालेला नाही. त्यामुळे कर्करोग रुग्णालयाचे काम कधी सुरू होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


रुग्णालयासाठी आवश्यक असलेला ना हरकत दाखला घेण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. येत्या काही दिवसांत हा दाखला प्राप्त होईल. रुग्णालयाचे अंदाजपत्रक व आराखडे अंतिम झाल्यानंतर लगेचच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
- दीपक खांबित, शहर अभियंता, मिरा-भाईंदर महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Parishad Election Candidates List : विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध; पक्षनिहाय उमेदवारांची यादी आली समोर, सर्वाधिक भाजपला संधी

Central Railway: मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक, लोकल सेवा पूर्ण बंद राहणार, मेल गाड्यांनाही फटका बसणार; कधी आणि कुठे?

India Census 2026 : राज्यात आजपासून जनगणनेला सुरूवात! घरबसल्या स्वतःच भरा ऑनलाईन माहिती; 'स्व-गणना' करण्याची काय आहे प्रक्रिया? जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : वाहतूक कोंडीत अडकलेल्या लोकांकडून टोल घेऊ नका- एकनाथ शिंदे

Char Dham Yatra: फक्त २ दिवसांत पूर्ण होणार चारधाम यात्रा? हवाई सेवेने दर्शन झाले सुपरफास्ट पण.. शंकराचार्यांनी दिला खास सल्ला

SCROLL FOR NEXT