मुंबई

टेबल टेनिस मानांकन स्पर्धेत नुराज मेमनला तिहेरी मुकुट

CD

विरार, ता. १० (बातमीदार) : पालघर जिल्हा टेबल टेनिस संघटना आणि युवा स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सेंट ऑगस्टीन्स हायस्कूल, वसई येथे ६ व ७ जुलै रोजी ‘डॅनी लुसबो स्मृतीचषक’ या दुसऱ्या जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आठ विविध वयोगटात खेळलेल्या आणि दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत पालघर जिल्ह्यातील टेबल टेनिसपटूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विरारच्या नुराज मेमन याने १७ वर्षांखालील, १९ वर्षांखालील, तसेच पुरुष खुल्या गटात विजेतेपद पटकावून तिहेरी मुकुटाचा मान मिळवला.

माजी टेबल टेनिसपटू स्वप्नील परेरा, टेबल टेनिस संघटक रोमिओ सिरेजो, प्रकाश शंभरकर, सदस्य हेमंत वाळिंजकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. ११ वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेत अंश कुरूप, तर १३ वर्षांखालील मुलांमध्ये हर्षित कटके आणि १५ वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेत शायान शेख विजेता ठरला आहे. ३९ वर्षांवरील पुरुष गटात प्रकाश आल्मेडा यांनी बाजी मारली. महिलांच्या गटामध्ये ईशाना बाबू विजेती ठरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambabai Temple Donations : अंबाबाई चरणी 20 लाखांचे सोने, 44 लाखांची चांदी; नवरात्रोत्सवात भाविकांकडून भरभरून दान, 36 लाखांवर रक्कमही खजिन्यात

El Nino: ‘एल निनो’मुळे थुथुकुडीची केळी धोक्यात; मॉन्सूनच्या अपुऱ्या पावसामुळे तमिराभरणी नदीचे सिंचन थांबले

Gold Price: दागिने खरेदीदारांसाठी खुशखबर; दिवाळीपूर्वी सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबरच्या शेवटी हवामान बदलणार; 'या' भागांत 'अवकाळी'ची शक्यता; जाणून घ्या २६ ते २९ ऑक्टोबरचा अंदाज

Devendra Fadnavis: तिसरी मुंबई ठरेल ‘ग्रोथ इंजिन’:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नैना’त १५ लाख रोजगारनिर्मितीचे लक्ष्य

SCROLL FOR NEXT