मुंबई

कल्याणमध्ये नवविवाहितेची आत्महत्या

CD

पोलिस पत्नीची आत्महत्या

कल्याणमधील घटना; छळप्रकरणी पती, सासूविरोधात गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १० : वडिलांनी आपल्या २४ वर्षीय मुलीचे लग्न मुंबई पोलिस दलात कामाला असलेल्या कल्याण येथील तरुणासोबत थाटामाटात लावून दिले. सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या या नवविवाहितेने पती आणि सासूच्या सततच्या टोमण्यांना वैतागून दोन महिन्यांतच आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. तिने मोबाईलमध्ये लिहिलेली नोट आणि तिच्या आईच्या तक्रारीवरून पती सागर बारी (वय ३२) आणि सासू शोभा बारी यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

कल्याणमधील आडीवली ढोकळी परिसरात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे गजानन वराडे यांची मुलगी जागृती हिचा विवाह पिंप्राळामधील सागर बारी याच्यासोबत २० एप्रिल २०२४ ला झाला होता. सागर हा मुंबई पोलिस दलात आझाद नगर पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे दोघे २१ जूनला कल्याणमधील आडीवली ढोकळी येथे राहायला जाणार होते. त्याआधी तिचे आई-वडील पिंप्राळा गावात भेटायला गेले होते. तेव्हा तिची सासू शोभा हिने हुंडा न दिल्याची त्यांच्याकडे तक्रार केली होती. तसेच मुंबईत घर घेण्यासाठी १० लाखांची मागणी केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर ५ जुलैला अचानक जागृतीचा भाऊ विशाल याला फोन करून तिने घरातील बेडरूममध्ये सिलिंग फॅनला गळफास घेतल्याचे सांगितले आणि फोन कट केला, असे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेने हादरलेले जागृतीचे आई-वडील आणि काही नातेवाईकांनी कल्याणमध्ये धाव घेत मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना पोलिस कोठडी सुनावली आहे. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तिच्या सासू आणि पतीवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी मृत मुलीच्या नातेवाईकांनी केली आहे.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

Sharad Pawar : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' कारखाना निवडणूक बिनविरोध होणार?, शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक

Fashion Psychology: सुंदर कपड्यांमुळे खरोखरच तुमचा मूड बदलतो का? जाणून घ्या डोपामिन ड्रेसिंग आणि मेंदूचं कनेक्शन!

शाहरुख खानच्या लेकाची पुन्हा कमाल; ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’च्या सीझन २ची कथा स्वतः लिहिणार!

Asian Games 2026: मनप्रीत, गुलवीर सिंग, बारानिका यांनी इतिहास घडवला! दिवसभरात १ सुवर्ण, दोन रौप्य अन् ३ कांस्यपदकांची कमाई

SCROLL FOR NEXT