मुंबई

गर्भाशय वाचवण्यावर स्त्रीरोगतज्ज्ञांचा भर

CD

गर्भाशय वाचवण्यावर स्त्रीरोगतज्ज्ञांचा भर
स्त्रीरोगतज्ज्ञांची विशेष कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : महिलांचे गर्भाशय वाचवण्याची जबाबदारी देशभरातील स्त्रीरोगतज्ज्ञांनी उचलली आहे. यासंदर्भात वेळोवेळी कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. या कार्यशाळेच्या माध्यमातून गर्भाशयाचे संरक्षण कसे करता येईल? यासंबंधित स्त्रीरोगतज्ज्ञांकडून युक्त्या शिकवल्या जात आहेत. सोबतच स्त्रीरोगतज्ज्ञांच्या मदतीने महिलांना गर्भाशयाबाबत जागरूकही केले जात आहे.

गर्भाशय सुरक्षित उपक्रमांतर्गत आयोजित ७५ व्या कार्यशाळेचा शनिवारी (ता. ६) मुंबईत समारोप झाला. ही कार्यशाळा फॉग्सी आणि मॉग्सी या स्त्रीरोगतज्ज्ञांची संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत विविध स्त्रीरोगतज्ज्ञांनी आपापले अनुभव एकमेकांना सांगितले आणि अनेक सूचनाही केल्या. कामा रुग्णालयाचे अधीक्षक व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. तुषार पालवे म्हणाले की, ‘केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने गर्भाशयाच्या शस्त्रक्रिया कमी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अंतर्गत गर्भाशयाची शस्त्रक्रिया करून ते सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळेच, या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्त्रीरोगतज्ज्ञांनी शस्त्रक्रियेपेक्षा गर्भाशयाशी संबंधित आजारांवर औषधोपचार करण्यावर भर देण्यास सांगितले आहे.’


..
गर्भाशय काढण्याचे सर्वात अधिक प्रमाण आंध्र प्रदेशात
राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणनुसार भारतात १५ ते ४९ वयोगटातील ३.३ टक्के भारतीय महिलांनी गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया (हिस्टेरेक्टोमी) केली होती. गर्भाशय काढण्याचे सर्वात अधिक प्रमाण आंध्र प्रदेश ८.७ टक्के आणि तेलंगणा ८.२ टक्के इतके दिसून आले. त्याखालोखाल बिहार ६ टक्के आणि गुजरात ४ टक्के आढळून आले. ईशान्येकडील प्रदेशात १.२ टक्के सर्वात कमी प्रमाण होते, अशी माहिती फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. जयदीप टांक यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT