bjp vidhan parishad devendra fadnavis esakal
मुंबई

Vidhan Prishad Election: फडणवीसांची आकडेमोड विधानपरिषद जिंकणार ? भाजप आमदारांना दिली मतदानाची गुरुकिल्ली

Devendra Fadnavis: विधान परिषदेसाठी आपल्याकडे पुरेसे बहुमत आहे. आपल्या मित्रपक्षांनाही आपल्याला जिंकवून द्यायचे आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधावारी रात्री उशिरा मतदान कसे करायचे, हे भाजप आमदारांना समजावून सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता.१० : विधानपरिषद निवडणुकीत पाच उमेदवार उतरवणाऱ्या भाजपने कोणतीही कसर न ठेवता सर्व तयारी निशी रिंगणात उतरायचे ठरवले आहे. बुधवारी मतदान कसे करावे, याची पहिली मॉकड्रील झाली तर दुसरी मॉकड्रील गुरुवारी (ता.११) अधिक गंभीरपणे होणार आहे. सकाळी दहा वाजता होणाऱ्या या बैठकीला केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादवही उपस्थित रहातील.

विधान परिषदेसाठी आपल्याकडे पुरेसे बहुमत आहे. आपल्या मित्रपक्षांनाही आपल्याला जिंकवून द्यायचे आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधावारी रात्री उशिरा मतदान कसे करायचे, हे भाजप आमदारांना समजावून सांगितले.

आज दुपारी फडणवीस आणि त्यांच्या विश्वासू सहकाऱ्यांनी मतांची आकडेमोड निश्चित केली. त्यात भाजपच्या पाच उमेदवारांना कसे निवडून आणता येईल, त्यासाठीचे नियोजन कसे असेल, सहकारी पक्षांना मते कशी हस्तांतरीत करायची याबद्दलचे विस्तृत विवरण करण्यात आले. आमदारांच्या या बैठकीत सविस्तर माहिती निश्चित करण्यात आली. आमदारांच्या रात्री झालेल्या या बैठकीत तज्ञांनी मार्गदर्शन केले.

शिवसेना शिंदे गटाकडे ४८ मते

भाजपचे सर्व आमदार आता पक्षादेशाप्रमाणे मतदान करणार आहेत. या बैठकीत काय सांगितले गेले ते बाहेर कुठेही बोलू नये, अशा सूचना सर्वांना देण्यात आल्या आहेत. भाजपकडे दोन मते कमी आहेत पण वेळेवर तसा पाठिंबा मिळेल, असे मानले जाते. नेत्यांचे गणित स्पष्ट आहे. शिवसेना शिंदे गटाकडे अपक्ष आमदारांसह ४८ मते आहेत. त्यांचे दोन्ही उमेदवार जिंकतील हे स्पष्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT