मुंबई

ऑनलाईन गंडा

CD

ऑनलाईन फसवणुकीतील टोळी गजाआड
सायबर सेल पोलिसांची कारवाई
अंधेरी, ता. ११ (बातमीदार) ः पार्टटाईम नोकरीची ऑफर देत टास्कवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून ऑनलाईन गंडा घालणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात पश्‍चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पाच जणांना ओरिसा येथून पोलिसांनी अटक केली आहे.
या टोळीने आतापर्यंत ऑनलाईन टास्कद्वारे कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे. प्रमोदकुमार रविंद्र बेहरा, राकेशकुमार हरिराम चौधरी, सुर्वेदू निरंकर दास, जयदीप अमरकुमार राऊत आणि मनोजकुमार अदिंचरम राऊत, अशी या पाच जणांची नावे आहेत. या आरोपींकडून पोलिसांनी विविध बँक खात्यात फ्रिज करण्यात आलेली सुमारे सात लाखांच्या कॅशसहीत ११ मोबाईल, ४७ विविध बँकेचे पासबुक, २३ बँकांचे चेकबुक, १०४ विविध बँकाचे एटीएम कार्ड, १० सिमकार्ड आणि एक बँक मॅनेजर स्टॅम्प आदी मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीने अलीकडेच एका वयोवृद्धाची ४३ लाखांची फसवणूक केली होती.
पश्‍चिम उपनगरात राहणारे वयोवृद्ध तक्रारदार काही वर्षे आखाती देशात कामाला होते. निवृत्तीनंतर ते भारतात परत आले होते. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये एका तरुणीने फोन करून नोकरीबद्दल माहिती दिली. ही कंपनी तरुण कलाकारांना आणि ब्लॉगर्सना प्रसिद्धी मिळवून देण्याचे काम करत असल्याचे सांगून लिंक पाठविली होती. टास्क पूर्ण केल्यानंतर त्यांच्या खात्यात ठराविक रक्कम जमा केली जाईल, असे सांगितले. तिच्यावर विश्‍वास ठेवून त्यांनी लिंकमध्ये दिलेले सर्व टास्क पूर्ण केले होते. भरघोस नफा देण्याच्या बहाण्याने त्यांना ४३ लाख ६२ हजार ७३१ रुपये भरण्यास प्रवृत्त केले होते, मात्र टास्क पूर्ण करूनही त्यांना परताव्यासह मूळ रक्कम मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी सायबर सेल पोलिसात तक्रार केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasba Ganpati in Texas: अमेरिकेत दुमदुमला कसबा गणपतीचा जयघोष ; ह्यूस्टन महाराष्ट्र मंडळाकडून पुण्याच्या ग्रामदैवताची प्रतिष्ठापना

Viral Video : विमान हवेत असताना दोन प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latur Crop Loss: निलंगा तालुक्यात खरीप पीक शंभर टक्के उद्ध्वस्त; कृषी विभागाच्या ‘७० टक्के’ अहवालावर शेतकऱ्यांचा संताप

Sahyadri Sugar Mill: सह्याद्री साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; घोषणाबाजी, गदारोळ आणि तणावपूर्ण वातावरण

Malegaon Tractor Attack Case: माळेगावात ट्रॅक्टरने जीवे मारण्याचा प्रयत्न; नरूटे कुटुंबीयांवर हल्ला, पाच जणांविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT