मुंबई

लावणी कलावंत महासंघाचा माया जाधव यांना जीवनगौरव

CD

लावणी कलावंत महासंघाचा माया जाधव यांना जीवनगौरव

धारावी, ता. ११ (बातमीदार) : मुंबई व महाराष्ट्रातील लावणी कलावंत आणि पडद्यामागील कलावंतांना एकत्र आणून १० वर्षांपूर्वी ‘लावणी कलावंत महासंघ’ची स्थापना करण्यात आली होती. कलाकारांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी या महासंघाची र्निमिती केली होती. या महासंघाला १० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल बुधवारी (ता. १०) दादरमधील शिवाजी मंदिरात वर्धापनदिन साजरा करण्यात आला. वर्धापनदिनानिमित्त शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव, माजी आमदार बाबुराव माने, रवी भिलाने यांच्या उपस्थितीत नृत्यसमशेर माया जाधव यांना महासंघाच्या जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.
यावेळी तबलावादक गोविंद हडकर, पार्श्वगायिका राधा धारेश्वर, लावण्यवती आकांक्षा कदम, निर्माता बाळासाहेब आहिरे, शाहीर विठ्ठल कदम, पुरुष लावणी कलावंत प्रमोद कांदळकर, लोककलावंत बतावणी यशवंत शिंदे, निवेदक सूचित ठाकूर, नृत्य दिग्दर्शक किरण काकडे, नेपथ्यकार उल्हास सुर्वे यांना लावणी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजाराणी पुरस्काराने सुचित्रा चाळके व जयेश चाळके यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी वयाच्या ७५ व्या वर्षीही माया जाधव यांनी लावणीवर नृत्य सादर करून रसिकांचे मन जिंकले, तर इतर पुरस्कार महासंघाच्या अध्यक्षा कविता घडशी, महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष लिंबोरे यांच्या हस्ते देण्यात आले.
कार्यक्रमाला विशाल सदाफुले, योगिता मोर्जे, विजय कर्जावकर आदी महासंघाचे पदाधिकारी, तसेच शहाजी काळे, चारुशिला गोलम, डॉ. कौतिक दांडगे, प्रवीण राणे, शिवाजी तोरणे, शिवाजी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
*******************
धारावी : नृत्यसमशेर माया जाधव यांना जीवनगौरव पुरस्काराने आमदार यामिनी जाधव आदींसह मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

Maharashtra Ganesh Visarjan Live: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री गिरगाव चौपाटीवर दाखल

Sharad Pawar : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' कारखाना निवडणूक बिनविरोध होणार?, शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक

SCROLL FOR NEXT