मुंबई

आंदोलनकर्त्या चित्रपट निर्मात्याला समज देत सुटका

CD

आंदोलनकर्त्या चित्रपट निर्मात्याला समज देत सुटका

प्रभादेवी, ता. ११ (बातमीदार) : दादर-शिवाजी पार्क परिसरात एका चित्रपट निर्मात्याने ॲनिमल वेल्फेअर बोर्डाच्या विरोधात झाडावर चढून अनोखे आंदोलन केले होते. यावेळी त्यांनी आत्महत्येचीही धमकी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी आणि अग्निशमनच्या जवानांनी त्यांना झाडावरून खाली उतरवले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत समज देऊन सोडण्यात आले.
ॲनिमल वेल्फेअर बोर्डाने एनओसीच्या नावावर पैसे घेऊ नये, अशी मागणी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक प्रवीणकुमार मोहरे यांनी करत ॲनिमल वेल्फेअर बोर्ड एनओसीच्या नावावर ३० हजार रुपये घेत आहे, ते बंद करावे, अशी मागणी केली होती.
चित्रपटांमध्ये काही प्राण्यांचे चित्र दाखवले जातात. त्यासाठी ॲनिमल वेल्फेअर बोर्ड एनओसीच्या नावावर ३० हजार रुपये घेतात. त्यामुळे हे पैसे घेऊ नयेत. हासुद्धा भ्रष्टाचाराचा एक प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अडथळे येत आहेत. मी एक मराठी चित्रपट बनवला आहे, मात्र तो चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अडथळे येत असल्याचे प्रवीणकुमार यांनी सांगितले होते.
दरम्यान, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक प्रवीणकुमार मोहरे यांनी केलेल्या या आंदोलनामुळे शिवाजी पार्क परिसरात खळबळ उडाली होती. शिवाजी पार्क पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत समज देण्यात आली, तसेच संबंधित बोर्डाला निवेदन देण्यात यावे, अशा सूचना करण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT