मुंबई

देशातील पहिली गिगाफॅक्टरी घेतेय आकार

CD

देशातील पहिली गिगा फॅक्टरी घेतेय आकार
इलेक्ट्रिक सेलची निर्मिती; ओलाकडून ८०० कोटींची गुंतवणूक

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीने इलेक्ट्रिक व्हेइकल (ईव्ही) निर्मितीच्या दिशेने पावले टाकण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे बदलत्या काळाची पावले ओळखत ओला इलेक्ट्रिकने ईव्ही गाड्यांसाठी आवश्यक असलेल्या बॅटरीमधील सेलच्या निर्मितीसाठी देशातील पहिली गिगा फॅक्टरी उभारण्याचे काम हाती घेतले आहे. आठशे कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे. त्यामुळे भारत इलेक्ट्रिक सेलच्या बाबतीत स्वावलंबी होऊ शकणार आहे.
ओलाचा इलेक्ट्रिक स्कूटर निर्मितीचा प्रकल्प तामिळनाडूत कृष्णगिरी जिल्ह्यातील पोचमपल्ली बरगूर येथे आहे. त्यालाच लागून ओला आता इलेक्ट्रिक बॅटरीसाठी लागणारे सेल तयार करण्यासाठी तब्बल ११० एकर जागेवर भव्य गिगा फॅक्टरी उभारत आहे. केंद्र सरकारने ओलाला २० गिगावाॅटच्या सेल उत्पादनाची परवानगी दिली आहे. ओला सध्या येथे ५ गिगावाॅट क्षमतेचा प्रकल्प उभारत असल्याचे ओला इलेक्ट्रिकचे एमडी भावेश अग्रवाल यांनी सांगितले.
चीन, कोरिया, जपानवरील अवलंबित्व संपणार
सध्या भारतातील वेगवेगळ्या ईव्ही कंपन्या चीन, कोरिया आणि जपान या देशामधून बॅटरीसाठी सेल आयात करत आहेत, मात्र ओलाकडून उभारण्यात येत असलेल्या गिगा फॅक्टरीमुळे चांगल्या दर्जाचे सेल कमी खर्चात भारतातच उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे चीन, कोरिया आणि जपान या देशांवर असलेले अवलंबित्व कमी होणार असल्याचेही अग्रवाल यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

SCROLL FOR NEXT