मुंबई

भाईंदरमधील सरकारी सेतू सुविधा केंद्र अखेर सुरू

CD

भाईंदर, ता. ११ (बातमीदार) : गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेले भाईंदरच्या अतिरिक्त तहसीलदार कार्यालयातील आपले सरकार सेतू सुविधा केंद्र अखेर सुरू झाले आहे. हे केंद्र बंद असल्याने नागरिकांना विविध दाखल्यांसाठी खासगी महा ई-सेवा केंद्रांकडे जावे लागत होते व त्या ठिकाणी त्यांची आर्थिक लुबाडणूक केली जात होती, मात्र आता हे केंद्र पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अतिरिक्त तहसीलदार कार्यालयातील आपले सरकार सेतू सुविधा केंद्र एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यानंतर तडकाफडकी बंद करण्यात आले. या केंद्रात सरकारी शुल्कात उत्पन्न, अधिवास, क्रिमिलियर आदी दाखले, त्याचप्रमाणे जात प्रमाणपत्र मिळत असे, मात्र केंद्र बंद झाल्यानंतर नागरिकांना खासगी महा ई-सेवा केंद्राकडे धाव घ्यावी लागत होती. त्या ठिकाणी दाखल्यांसाठी अव्वाच्या सव्वा शुल्क वसूल केले जात होते. आपले सरकार सेतू सुविधा केंद्र बंद असल्याबद्दल अनेक तक्रारी तहसीलदार कार्यालय, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात झाल्या होत्या, मात्र केंद्र पुन्हा सुरू होण्याबाबत कार्यवाही होत नव्हती.

नागरिकांची गैरसोय व लुबाडणूक होत असल्याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते, तसेच खासदार नरेश म्हस्के यांनी समस्येची दखल घेऊन ठाणे जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला व बंद असलेले केंद्र तत्काळ सुरू करण्याची मागणी केली. त्यानंतर बुधवारी (ता. १०) हे केंद्र सुरू करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly election results 2026 Live Update: राहुरीत राष्ट्रवादीला मोठा धक्का! गोविंद मोकाटे यांना केवळ ३,५२२ मते

Chhatrapati Sambhajinagar: नव्या योजनेतून जूनमध्ये नळाला पाणी; तांत्रिक कामे संथ, जलशुद्धीकरणासाठी केंद्राचे प्रमाणपत्रही आवश्यक

India Thomas Cup 2026: भारताचं सुवर्ण स्वप्न भंगलं! फ्रान्सने रोखला टीम इंडियाचा रथ; थॉमस कपमध्ये 'ब्राँझ'वर मानावं लागलं समाधान

Shirala Accident News : शिराळ्यात भीषण अपघात! भरधाव टेम्पोची धडक; घरचा आधार योगेशचा जागीच मृत्यू, ६ महिन्यात एकाच घरातील ४ जणांच्या मृत्यूने हळहळ

Infrastructure Success: ऋतुजा नागटिळक-ढोक ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पात चमकली; जगातील लांब बोगदा प्रकल्पात महत्त्वाची भूमिका, बहुराष्ट्रीय कंपनीत मॅनेजर!

SCROLL FOR NEXT