मुंबई

बीकेसी परिसरात चार दिवस वाहतूक बदल

CD

बीकेसी परिसरात चार दिवस वाहतूक बदल 
अनंत अंबानी विवाह सोहळा; कोंडी कमी करण्याचा प्रयत्‍न
सकाळ वृत्तसेवा 
मुंबई , ता ११ : उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांचा विवाह राधिका मर्चंट यांच्याशी शुक्रवारी (ता. १२) जिओ वर्ल्ड कन्वेन्शन सेंटर, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व  येथे होणार आहे. यावेळी हॉलीवूड आणि बॉलीवूड सेलिब्रिटी, क्रिकेटर्स, मोठे उद्योगपती उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.  वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बीकेसी परिसरात  १२ जुलै दुपारी १ ते १५ जुलै रात्री १२ वाजे पर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी दिली आहे. 

असे असतील बदल 
प्रवेश : लक्ष्मी टॉवर जंक्शन येथून, धिरूबाई अंबानी स्क्वेअर ॲव्हेन्यू लेन-३ मार्गे इंडियन ऑईल बंद मार्ग पेट्रोल पंप, डायमंड जंक्शन, हॉटेल ट्रायडेंट, तसेच एमटीएनएल कुर्ल्याच्या दिशेने जाण्याकरिता (कार्यक्रमाकरिता येणारी वाहने वगळून) सर्व वाहनांना प्रवेशबंदी राहील.

पर्यायी मार्ग  : वन बीकेसीकडून येणारी वाहतूक ही लक्ष्मी टॉवर जंक्शन येथून डावे वळण घेऊन पुढे डायमंड मार्ग गेट नं. ८ समोरून नाबार्ड जंक्शन येथून उजवे वळण घेतील. पुढे डायमंड जंक्शन येथून उजवे वळण घेऊन धिरूबाई अंबानी स्क्वेअर/इंडियन ऑईल पेट्रोल पंप येथून पुढे बीकेसी परिसरात मार्गस्थ होतील.

प्रवेशबंद मार्ग : कुर्ला, एमटीएनएल जंक्शन, प्लॅटीना जंक्शन, डायमंड जंक्शन व बीकेसी परिसरातील सर्व वाहनांना बीकेसी कनेक्टर ब्रिजच्या दिशेने जाण्याकरिता धीरूभाई अंबानी स्क्वेअर/इंडियन ऑईल पेट्रोल पंप येथून (कार्यक्रमाकरिता येणारी वाहने वगळून) सर्व वाहनांना प्रवेशबंदी राहील.

पर्यायी मार्ग : कुर्ला, एमटीएनएल जंक्शन, प्लॅटीना जंक्शन, डायमंड जंक्शन, नाबार्ड जंक्शन डावे वळण व डायमंड गेट नं. ८ समोरून लक्ष्मी टॉवर जंक्शन येथून उजवे वळण घेऊन बीकेसी परिसरात मार्गस्थ होतील.

प्रवेशबंद मार्ग :- भारत नगर, वन बीकेसी, वुई वर्क गोदरेज बिकेसीवरून (कार्यक्रमाकरिता येणारी वाहने वगळून) सर्व वाहनांना जिओ कन्वेंशन सेंटर गेट क्र. २३ येथून अमेरिकन वकालत, एमटीएनएल जंक्शनच्या दिशेने जाण्याकरिता प्रवेशबंदी राहील.

पर्यायी  मार्ग  :- कौटील्य भवन उजवे वळण पुढे ॲव्हेण्यु १ रोडने इन्शुरन्स इन्स्टीट्यूट कार्यालयामागील बाजू-अमेरिकन वकालत मागील बाजू धिरुभाई अंबानी स्कूल येथून इच्छीतस्थळी मार्गस्थ होतील.

एमटीएनएल जंक्शन येथून (कार्यक्रमासाठीची वाहने वगळून) सर्व वाहनांना -सिग्नेचर /सनटेक बिल्डींग येथून अमेरिकन वकालत, जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर, बीकेसी कनेक्टर ब्रिजच्या दिशेने जाण्याकरिता प्रवेशबंदी राहील. 

पर्यायी मार्ग - धिरुभाई अंबानी स्‍कूल डावे वळण ॲव्हेण्यू १ रोडने अमेरिकन वकालत मागील बाजू-इन्शुरन्स इन्स्टीट्यूट कार्यालयामागील बाजू वी वर्क बिल्डींग उजवे वळण-गोदरेज बीकेसी डावे वळण घेऊन इच्छीतस्थळी मार्गस्थ होतील.

एक दिशा मार्ग
१) लतीका रोड हा अंबानी स्क्वेअर ते लक्ष्मी टॉवर जंक्शनपर्यंत वाहतुकीसाठी एक दिशा मार्ग करण्यात येत आहे.
२) ॲव्हेन्यू ३ रोड हा कौटील्य भवन ते अमेरिकन वकालत जंक्शनपर्यंत वाहतुकीसाठी एक दिशा मार्ग करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT