vasai shivsena shakhapramukh son CCTV Video Viral esakal
मुंबई

Vasai: जमावाने मारहाण केल्यामुळे हृदयविकाराचा झटका आला अन्.. शिवसेना माजी जिल्हाप्रमुखाच्या मुलाचा वसईत मृत्यू CCTV Video Viral

Vasai Viral Video: ठाण्याचे माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांचा मुलगा मिलिंद मोरे यांचे विरारच्या अर्नाळामध्ये रविवारी (ता. २९) निधन झाले. मोरे हे अचानक कोसळतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

CD

नालासोपारा, ता. २९ (बातमीदार) : ठाण्याचे माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांचा मुलगा मिलिंद मोरे यांचे विरारच्या अर्नाळामध्ये रविवारी (ता. २९) निधन झाले. मोरे हे अचानक कोसळतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

मोरे हे नवाबपूर येथील सेवन सी रिसॉर्टमध्ये कुटुंबीयासमवेत आले होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रिसॉर्टच्या बाहेर रिक्षाचे चाक पायावरून गेल्याने त्याची याठिकाणी काही जणासोबत बाचाबाची झाली. यावेळी जमावाने मारहाण केल्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

या प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेऊन, तत्काळ पोलिस उपायुक्त जयंत बजबळे यांच्याशी फोनवरून चर्चा करून योग्य ती कारवाही करावी असे आदेश दिल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे वसई तालुका प्रमुख सुदेश चौधरी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: ​सासरी होणाऱ्या मानहानीला अन् छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT