Hardhal Bhadane accident esakal
मुंबई

Harshal Bhadane: पत्रकार हर्षल भदाणे यांचे अपघाती निधन,मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना तत्काळ कारवाई करण्याचे आदेश

Dhule Truck Accident: हर्षल यांच्या पार्थिवावर उद्या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. हर्षल यांच्या पश्चात आई, वडील आणि पत्नी असा परिवार आहे

CD

नवी मुंबई, ता. २९ : धुळे येथे झालेल्या भीषण अपघातात नवी मुंबईतील पत्रकार हर्षल भदाणे-पाटील यांचे सोमवारी अपघाती निधन झाले, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धुळ्याच्या पोलिस अधीक्षकांना तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. पोलिसांनी आतापर्यंत दोन जणांना अटक केल्याचे समजते.

धुळे-संभाजीनगर महामार्गावर गरताड गावाजवळ एका भरधाव ट्रकने हर्षल यांच्या चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. भरधाव ट्रक कारला धडक देऊन धुळे शहरात घुसला. मालेगाव रोडवर शिवाजी महाराज चौकात ट्रक चालकाने आणखी चार दुचाकी चिरडून ट्रक सोडून पळ काढला. यावेळी संतापलेल्या जमावाने ट्रकची तोडफोड केली. या अपघातात हर्षल यांचा मृत्यू झाला.

हर्षल यांच्या पार्थिवावर उद्या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. हर्षल यांच्या पश्चात आई, वडील आणि पत्नी असा परिवार आहे. हर्षल यांच्या अपघाताची बातमी समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मोठा धक्का ! ९२ लाख महिलांची नावे वगळली; 'ही' मोठी कारणे आली समोर

Mumbai News: एकुलती एक मुलगी, १६ वर्षे कोमात, ३७ लाख भरपाई देण्याचे आदेश; वेदनांची भरपाई पैशात होणार नाही !

Adani समूह आता स्मार्ट मीटर कंपनी विकत घेण्याच्या तयारीत; 1500 कोटींची डील होण्याची शक्यता...

Latest Marathi News Live Update : तामिळनाडूमध्ये गोवंश हत्याबंदी लागू करण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्देशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

Pune News: दूषित पाण्यामुळे आरोग्याशी खेळ! कात्रजमध्ये पाणीपुरवठा विभागाचा गोंधळ; जलवाहिनीच्या गळतीमुळे पाणीटंचाई आणि दूषित पाणी

SCROLL FOR NEXT