मुंबई

विद्यार्थ्यांकडील मोबाईलची जागा ‘एनआयई’ घेईल

CD

अलिबाग, ता. २७ (बातमीदार) : मुलांच्या हातातील मोबाईल काढण्यास ‘एनआयई’ची फार महत्त्वाची भूमिका राहणार आहे. हा बदल एका रात्रीत होणार नसला तरी ‘एनआयई’ हे साप्ताहिक मुलांच्या मनावर खोलवर परिणाम घडवून आणेल. मुलांच्या हातातील मोबाईलची जागा ‘एनआयई’ घेईल आणि त्‍यांच्या गुणवत्तेत नक्‍की वाढ होईल, असा विश्‍वास अलिबाग नगर परिषदेच्या शहर समन्वयक आर्या जाधव यांनी व्यक्त केला.
अलिबाग शहरातील रामनाथ येथील नगर परिषदेच्या शाळा क्रमांक चारमध्ये ‘सकाळ एनआयई’तर्फे गणेशमूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेचे नुकतेच आयोजन केले होते. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक अंकुश गावंड, ॲड. हर्षल मोरे, प्रशिक्षक हिमालय चोरघे व शाळेतील शिक्षक व पालक उपस्थित होते.
‘सकाळ एनआयई’च्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळाला असून त्यांच्यातील एकजूट पाहायला मिळाली. मुलांच्या हातातील मोबाईल काढण्यास ‘एनआयई’ची भूमिका महत्त्वाची असून घराघरांत पुन्हा एकदा पेपर येण्यास सुरुवात झाली आहे. मध्यंतरी अनेक घरांत वर्तमानपत्र येत नसल्‍याने मुलांना अवांतर वाचनाची गोडीच राहिली नव्हती, मात्र आता त्यांना रुचेल, समजेल असे लेखन असलेले वर्तमानपत्र हातात मिळाल्‍यामुळे नक्कीच बदल घडून येईल, असा विश्वास जाधव यांनी व्यक्‍त केला.

पर्यावरणपूरक मूर्ती बनवण्यासाठी शाडूची माती लागते. मातीच्या गणेशमूर्ती सुकण्यास वेळ लागतो व वजनालासुद्धा जड असतात, तसेच मूर्तीही फार उंचीची बनवता येत नाही. त्यामुळे मागणी कमी असते, मात्र गेल्‍या काही वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची मागणी वाढली आहे. शाडूच्या मातीपासून बनवलेली मूर्ती पाण्यात विरघळत असल्यामुळे पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचत नाही.
- हिमालय चोरघे, प्रशिक्षक-मूर्तिकार, कैलास कला निर्माण केंद्र, नागाव

‘सकाळ एनआयई’ने सुरू केलेला पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा हा उपक्रम फारच उपयुक्त आहे. ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या बातम्‍या, विविध विषयांवरील लेखांचा उपयोग स्पर्धा परीक्षांसाठीही होतो. शाळेतील मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल व्हावा, यासाठी ‘सकाळ एनआयई’चे उपक्रम कौतुकास्पद आहेत.
- अंगाई साळुंखे, मुख्याधिकारी, अलिबाग नगर परिषद

अलिबाग ः प्रशिक्षक हिमालय चोरघे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT