मुंबई

फुजीफिल्मची विविध रुग्णालयासोबत शैक्षणिक भागीदारी

CD

देशात गॅस्ट्रो एआय अकादमीची स्थापना
जनरल फिजिशियन, शल्य चिकित्सांना एआयचे शिक्षण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : भारतातील पहिल्या गॅस्ट्रो एआय अकादमीची स्थापना झाली असून ''फुजीफिल्म'' या आरोग्य सेवा तंत्रज्ञान कंपनीने विविध रुग्णालयांसोबत शैक्षणिक भागीदारी केली आहे. एचएन रिलायन्स रुग्णालयात एका कार्यक्रमादरम्यान नुकताच या अकादमीचा शुभारंभ झाला. फुजीफिल्मने आरोग्य सेवा तंत्रज्ञान सुधारण्यासाठी, देशातील अनेक नामवंत गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टनी गॅस्ट्रो एआय अकादमी स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी क्षेत्रात बदल घडवून आणणे हा अकादमीच्या स्थापनेचा उद्देश आहे.

अकादमी अंतर्गत जीआय फिजिशियन आणि शल्य चिकित्सकांना मोफत ''एआय'' बाबतचे शिक्षण दिले जाईल. रुग्णांची चांगली काळजी घेण्यासाठी आणि उपचारांमध्ये सुधारणा करण्यासाठी सर्वंकष ज्ञान आणि कौशल्ये सुसज्ज केली जातील. तज्ज्ञ तंत्रज्ञानाच्या वापरासाठी तयार आणि तंत्रज्ञानाबाबत जागरूक राहतील, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

कोट
गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीचे क्षेत्र नेहमीच अत्याधुनिक शोध आणि तंत्रज्ञानाने पुढे जात आहे. यामुळे रुग्णांच्या सेवेमध्ये सुधारणा झाली आहे. रुग्णालयात राहण्याचे प्रमाण कमी होऊन आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर गरजेचा झाला आहे.
-डॉ. अमित मायदेव, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट

भारतातील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट जीआय संबंधित रोगांचे उपचार आणि निदान सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. आम्ही यूएस, युरोपमधील अकादमीचे आभारी आहोत. जपान आणि इतर अनेक देशांतील एआय तंत्रज्ञानाला मिळालेले समर्थन हे उल्लेखनीय आहे.
डॉ. राजकुमार वाधवा, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT